उस्मानाबाद जिल्ह्यातील त्या नरबळी प्रकरणाच्या निकालानंतरच मला मरण यावे

 
निवृत्त अति. पोलीस महासंचालक टी. के. चौधरी यांची अंतिम इच्छा 

 उस्मानाबाद जिल्ह्यातील त्या  नरबळी प्रकरणाच्या निकालानंतरच मला मरण यावे


उसगाव - एका राज्य पोलीस दलातील निवृत्त  अति. पोलीस महासंचालकांची  अंतिम इच्छा खरोखरच अनेकांना अचंबित करणारी ठरली आहे. एक कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक अधिकारी म्हणून छवी असलेले निवृत्त पोलीस महासंचालक टी के चौधरी यांनी व्यक्त केलेल्या अंतिम इच्छेत "त्या नरबळी प्रकरणाच्या न्यायालयीन निकालानंतरच मला मरण यावे, किंबहुना त्या निकालासाठीच मी अद्याप जिवंत आहे" असे वक्तव्य केले. श्रमजीवी संघटना आयोजित ऑनलाईन संघटक प्रशिक्षण शिबिरात ते उदघाटक म्हणून बोलत होते.


श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून या लॉकडाऊन काळात zoom ऍप्लिकेशनचा वापर करून संघटनेने 7 दिवसाच्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.त्यात अनेक अधिकारी, वकील, पत्रकार यांचा सहभाग सुविधकार म्हणून सहभाग आहे. या शिबिराचे उदघाटन सद्या अमेरिकेत असलेले आणि महाराष्ट्र पोलीस दलात वर्ग 1 चे अधिकारी म्हणून निवृत्त झालेले टी के चौधरी यांनी केले.यावेळी त्यांनी अनेक विषयांना हात घालत अत्यंत उद्बोधक मार्गदर्शन केले. यात त्यांनी सेवेत असताना विवेक पंडित आणि श्रमजीवी संघटनेसोबत केलेल्या कामाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी उस्मानाबाद येथील नरबळी प्रकरणाचा विषय काढत त्या प्रलंबित प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागत नाही तो पर्यंत मृत्यही माझ्या जवळ येऊ शकणार नाही असे वक्तव्य केले. वयाच्या पंचाहत्तरीत हीच माझी अंतिम इच्छा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यातली संवेदनशिलता आणि समाजातील दुर्बल अन्याग्रस्त समाज घटकाबद्दलची तळमळ पाहायला मिळाली. हे वक्तव्य मात्र क्षणभर आश्चर्य व्यक्त करायला लावणारे ठरले.

काय आहे नरबळी प्रकरण ..  या निमित्ताने विवेक पंडित यांनी स्वतःच या प्रकरणाबाबत प्रकाश टाकला.
काय म्हणाले विवेक पंडित...?

 उस्मानाबाद जिल्ह्यातील त्या  नरबळी प्रकरणाच्या निकालानंतरच मला मरण यावे


1996-97 साली उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जवळा खुर्द या गावातील राजाभाऊ लोंढे या 25 वर्षाच्या मातंग तरुणाला विहरील पाणी लागत नाही म्हणून नर बळी दिला.मातंग कुटुंबातला मोठ्या मुलाचा बळी दिल्यास  पाणी लागतं अशी अंधश्रद्धा आहे तिथे. त्यातून त्याचा बळी दिला आणि पोलिसांनी ते प्रकरण त्याला मानसिक धक्का बसून म्हणजे तो विहीर खानायला गेला आणि त्यावेळी त्याने नाग बघितला नाग नाग ओरडला आणि तिथेच तो मेला असं प्रकरण करून आकस्मित मृत्यू दाखल करून  केस फायनल केली. त्या नंतर ते प्रकरण मला कळलं मी लगेच तेथे गेलो आणि मी पाहिलं. त्या ठिकाणी,  त्याची पूजा केलेली होती, डोक्याला त्याच्या गंध लावलेलं होतं, अमावसेचा दिवस होता त्याच्या वडिलांनी पोलिसांना रडून सांगितलं की त्याचा बळी दिलाय पण पोलिसांनी ते मानलं नाही, इलेक्ट्रिक क्रेन मध्ये त्याला बसवलं आणि त्या क्रेन ला करंट सोडला. ज्या वेळी त्याने त्याचा पाय खाली ठेवला त्यावेळी अर्थिंग मिळाल्या बरोबर तो मयत झाला, या पद्धतीने त्याचा बळी दिला होता मी मी वैद्यकीय अधिकाऱ्या समोर गेलो तेव्हा लगेच वैधकीय अधिकाऱ्यांनी "तो साप साप  ओरडुन मेला" असे उत्तर दिले. मी म्हंटलं मी कशा करता आलोय? काय विचारायला आलोय?  हे काहीच न विचारता तुम्ही मला कस सांगताय हे. ते म्हणाले नाही मला असं वाटलं, मी म्हटलं तुम्हाला वाटलं कसं? आणि नाग बघून ओरडून मेला तर तुम्ही पोस्टमॉर्टेम केलं की जागेवर गेला होतात नाग बघायला? म्हणून माझा संशय वाढला. 

मी पोस्टमार्टेम रिपोर्ट घेतला, इंक्वेस्ट पंचनामा पहिला, त्या इंक्वेस्टमध्ये  कपाळाला गंध लावल्याच वैगरे काहीच नव्हते,  नाग नाग बघून ओरडून मेला आणि पोस्टमॉर्टेम मध्ये सुद्धा तसंच आलं कि मानसिक धक्का लागून मृत्यू . मग मी या प्रकरणात आणखी खोल शिरलो, मानसिक धक्क्याचे  प्रकार अभ्यासले,  त्यात 12 प्रकाचे शॉक सांगितलेले आहेत. आणि मानसिक शॉक हा सर्व शॉक वगळले कि शेवटचा शॉक राहतो तो मानसिक शॉक. मी।त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले तुम्ही अगदी शेवटच्या कंक्लुजनवर कसे आलात.? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं.  पोलीसही तेच सांगायला लागले नाग नाग बघून ओरडून मेला.
 त्या दिवशी लाईट होती की नाही हे त्यांना विचारलं तर ते हि सांगतात लाईट नव्हती त्या दिवशी. असे सगळे प्रकरण संशयास्पद झाले होते, मग मी माझं सगळं निरीक्षण, मिळालेली महितो घेऊन टी के चौधरींना भेटलो,  त्या वेळी चौधरी नागरी हक्क संरक्षण विभागाचे महानिरीक्षक होते., मग मी त्यांना हे सर्व  सांगीलत्या नंतर त्यांनी ताबडतोबिन मराठवाडा विभाग ,औरंगाबाद विभागाचे त्याकाळचे उपअधीक्षक यांच्या कडे हे प्रकरण दिलं. त्यांनी तपास केल्या नंतर माझं फाईंडिंग  आणि त्यांचं फाईंडिंग सारखं आढळलं.  मग त्यांनी पोलीस अधिकारी , पंचनामा करणारा, FIR दाखल करणारा, पंच, MSEB चा इंजिनियर, डॉक्टर आणि ज्याने बळी दिला तो या सर्वांच्या विरोधी त्यांनी 302 (खून) सोबत ऍट्रॉसिटी दाखल केली,,यामुळे सगळ्या आरोपींची पळापळ झाली. जमिनाला अर्ज केला जमीन नाकारले, तिथला वरिष्ठ वर्ग सगळा एक झाला आणि त्यांनी राजकीय वजनाचा आधार घेत हे प्रकरण CID कडे द्यायला राज्यसरकारला भाग पाडले,चौधरी साहेबांच्या हातून ते cid कडे गेलं.  Cid ने तो जो विहिरीचा मालक आहे त्याला बेफिकीरी मुळे 304 ने दोषी ठरवलं. आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सोडून दिल, मग मी प्रायव्हेट केस दाखल केली उस्मानाबादच्या कोर्टात प्रायव्हेट 302 ऍट्रॉसिटी , मी जरी पंडित असलो तरी जो मेलेला आहे तो SC आहे आणि माझे साक्षीदार म्हणून मी,  टी के चौधरी आणि अजून एका अधिकाऱ्यांना सुद्धा घेतलं , त्याच्या भावाला घेतलं, वडिलांना घेतलं हि प्रायव्हेट केस होती, आणि मग त्या केस मध्ये ती चार्जशिट झाली आणि चार्जशीट झाल्यानंतर सगळे आरोपी कन्फर्म झाले त्याच्यात आणि ती केस गेली 26 वर्षे उस्मानाबाद च्या कोर्टात पेंडिंग आहे. ती गेल्यावर्षी चालायला सुरुवात झाली आणि जज बदलले. या आधी एकही जज ती केस चालवायला तयार नव्हता ,आता त्यांची बदली झाल्या नंतर वर्षभर त्या केस ला हात लावला नाही त्यात त्या दुसऱ्या अधिकऱ्याची  साक्ष झाली ती पूर्ण पणे माझ्या बाजूने झाली,त्या ननंतर त्याच्या वडिलांची , त्याच्या भावाची झाली आता टी के चौधरींची राहिली होती कारण कोर्ट आता केसची सुनावणी घेतच नाही , यासाठी स्वतंत्रपणे हाय कोर्टात जावं लागेल. असे पंडित यांनी याबाबत बोलताना सांगितले।
.

From around the web