गुड न्यूज : चिखलीतील चार पैकी तीन रिपोर्ट निगेटिव्ह
Sun, 3 May 2020
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथील चार पैकी तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, एकाचा रिपोर्ट पेंडिंग आहे. तोही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये राहणार आहे.
सोलापुरात ड्युटी करणारा चिखली गावातील एक पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह आल्यानंतर खळबळ उडाली होती, त्यानंतर त्या पोलिसांच्या आई, वडील, भाऊ, भावजय या चौघांचे स्वॅब तपासणीसाठी सोलापुरात पाठवण्यात आले होते. पैकी तिघांचे रिपोर्ट आले असून, ते निगेटिव्ह आहेत तर एक रिपोर्ट पेंडिंग असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजभाऊ गलांडे यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २१ दिवसांत एकही कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण नाही. उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे. परंतु चिखली गावातील एका पोलीस कॉन्स्टेबलमुळे संकटाचे ढग जमा झाले होते. उर्वरीत पेंडिंग रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास हा जिल्हा ग्रीन झोन मध्ये राहणार आहे.
धक्कादायक : आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलची चिखली वारी
धक्कादायक : आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलची चिखली वारी
चार जण आयसोलेट
कोरोना बाधित पोलिसाच्या आई, वडील, भाऊ आणि भावजय यांना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसोलेट करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळलेली नव्हती, त्यात तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.