आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात घसरण

 
आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात घसरण

मुंबई, २७ जुलै २०२०:  बँकिंग आणि आर्थिक स्टॉक्स घसरल्याने आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय बाजारात घट झाल्याचे दिसून आले. निफ्टी ०.५६% किंवा ६२.३५ अंकांनी घसरला व ११,१३१ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५१% किंवा १९४.१७ अंकांनी घसरला व त्यांनी ३७,९३४.७३ अंकांवर विश्रांती घेतली.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह  यांनी सांगितले की आज जवळपास १७९० शेअर्स घसरले, ८५७ शेअर्सनी नफा कमावा तर १६१ शेअर्स स्थिर राहिले. आयसीआयसीआय बँक (६.०५%), झी एंटरटेनमेंट (३.९९%), एचडीएफसी बँक (३.५०%), अॅक्सिस बँक (३.०७%), आणि इंडसइंड बँक (२.९३%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. तर एशियन पेंट्स (३.५३%), एचसीएल टेक (३.०७%), इन्फोसिस (२.६३%), टीसीएस (२.२१%) आणि बीपीसीएल (२.०१%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप १.०० टक्क्यांनी घसरला तर बीएसई स्मॉलकॅपमध्येही ०.९८ टक्क्यांची घसरण झाली.
येस बँक:  बँकेने एफपीओसाठी दिलेले शेअर्स बोर्सेसच्या यादीवर आले. त्यानंतर येस बँकेचे शेअर्स ९.८९% नी घसरले व त्यांनी १२.३० रुपयांवर व्यापार केला.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड:  कंपनीचे सीईओ यांनी ‘बँक कंपनीतील ४% स्टेक कमी करेल,’ असे वक्तव्य केल्यानंतर आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स ८.३०% नी घसरले व त्यांनी ४९३.०० रुपयांवर व्यापार केला.
एचडीएफसी बँक:  बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी बँकेतील ०.१३% चे स्टेक विकले. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ३.५०% नी घसरले व त्यांनी १,०७९.९५ रुपयांवर व्यापार केला.
एशियन पेंट्स:  कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वार्षिक निव्व‌ळ नफ्यात ६६.७% ची घसरण दर्शवली. तर कंपनीचा महसूलदेखील ४२.७% नी घसरला. तथापि, कंपनीचे स्टॉक्स ३.५३% नी वधारले व त्यांनी १,७७२.५५ रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया:  देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये विक्री दिसून आल्याने भारतीय रुपयाने नफा गमावला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत त्याने ७४.८३ रुपयांचे मूल्य कमावले.
सोने:  अमेरिका-चीनमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणुकदारांनी सुरक्षित मालमत्तेकडे कल दर्शवला. परिणामी पिवळ्या धातूचे दर सर्वाधिक पातळीला म्हणजेच ५२,००० प्रति १० ग्राम एवढे झाले.
जागतिक बाजार:  वाढते कोव्हिड-१९ चे रुग्ण आणि अमेरिका-चीनदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे एशियन मार्केटमध्ये व्यापारत घसरण दिसून आली. नॅसडॅकचे शेअर्स ०.९४% तर निक्केई २२५ आणि हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.१६% आणि ०.४१% नी घसरले. युरोपियन मार्केटनेही घसरणीचा कल दर्शवला. एफटीएसई१०० चे शेअर्स ०.२५% नी तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.४२% नी घसरले.

From around the web