कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे शेअर बाजार घसरण

 
कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे शेअर बाजार घसरण

मुंबई, ८ मे २०२०:  भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली व ती एका कमकुवत स्थितीवर थांबली. सेन्सेक्स २४२.३७ अंकांनी घसरून ३१,४४३.३८ अंकांवर थांबला. निफ्टी ७१.८५ अंकांनी घसरून ९१९९.०५ अंकांवर थांबला. सेन्सेक्समधील प्राथमिक घसरण एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेची झाली. एकूणच, बाजाराची स्थिती तटस्थ असून एनएसईत ८१२ शेअर्समध्ये वृद्धी होऊन ९३९ शेअर्सने घसरण नोंदविल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.
निफ्टीचा डाउनट्रेंड मंदावला:
निफ्टीने आजही घसरण अनुभवली तरी आज घसरणीचा वेग मंदावला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही संमिश्र अवस्थेत येऊन थांबले. यात निफ्टी मिडकॅपमध्ये १०० निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरले आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढले.
पीएससयू बँक टॉप गेनर्समध्ये:
११ क्षेत्रांमध्ये घसरण दर्शवल्यामुळे निफ्टी वित्तीय सेवेचा निर्देशांक १.६ टक्क्यांनी घसरला. इतर वैयक्तिक शेअर्ससह निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स ०.५ टक्क्यांसह टॉप गेनर्समध्ये होती. मार्चच्या तिमाहीत खासगी क्षेत्रातील बँकेचा नफा २,६२८.६१ कोटी रुपये झाला तर मागील वर्षी याच कालावधीत १,५०६.६४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. येस बँकेच्या शेअर्समध्ये संपूर्ण दिवसातील डील्समध्ये २० टक्के वाढ झाली. इतर गेनर्समध्ये इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, महिंद्रा अँड महिंद्रा अनुक्रमे ६.५८ टक्के, ४.३९ टक्के आणि ३.६८ टक्क्यांनी वाढले.
एनटीपीसी हा ४.३ टक्क्यांची घसरण घेत टॉप लूझर ठरला व ९०.६० रुपयांवर थांबवा. इतर बाजाराच्या नुकसानामध्ये ओनजीसी ४.१६ टक्के घसरणीसह, भारत पेट्रोलियम ४.२५ टक्के आणि कोटक महिंद्रा बँक ३.६९ टक्के घसरणीसह सहभागी झाले. भारती एअरटेल, यूपीएल, झी एंटरटेनमेंट आणि बजाज ऑटो यांनीदेखील २.७ ते ४.२५ टक्क्यांची घसरण घेत नुकसान झेलले.
लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेची भावना वाढली. त्यामुळे भविष्यात अर्थव्यवस्था व कॉर्पोरेट उत्त्पन्नात कमकुवतपणा येऊ शकतो. जागतिक बाजारपेठेचा विचार करता, कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण कायम आहे. यावरून असे दिसते की, जागतिक अर्थव्यवस्था अजूनही सुधारणेच्या वाटेवर नाही. त्यामुळे भारतीय बाजारदेखील अस्थिर राहिल अशी अपेक्षा आहे.

From around the web