लॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली

 
लॉकडाऊन  : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली


उस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन वाढविण्यात आले असून लॉकडाऊनमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत आदेश जारी केलेला आहे.

   या आदेशान्वये काही  आदेशात  दुरुस्ती करण्यात येत असून पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे. सर्व अत्यावश्यक वस्तूंची (किराणा, दूध, भाजीपाला, फळे इ. जिवनावश्यक वस्तूंची दुकाने) दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. मेडीकल, औषधी दुकाने 24 तास चालू ठेवण्यास परवानगी राहील.

या आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तींकडुन या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी आदेश जारी केले आहेत.

जिल्हयात लॉकडाऊन बाबत कोणतीही  अफवा पसरू नये -जिल्हा‍धिकारी  

 आज दि.21 सप्टेंबर 2020 रोजी मा. जिल्हा‍धिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांनी सर्व नगराध्यक्ष व सर्व  पंचायत समिती  सभापती  यांची  VC व्दारे Corona उपाययोजना व माझे कुटुंब माझी जबाबदारी  या योजनेची आढावा बैठक घेतली त्यानुसार वैद्यकीय औषधे दुकाने 24 तास  सुरू राहतील व इतर सर्व आस्थापना  दुकाने 09 ते 05 या वेळेत सुरू राहतील,पार्सल सेवा पुर्वी प्रमाणेच रात्री 10.00 वाजेपर्यंत राहील, जिल्हयात वेगवेगळया वेळा असु नयेत जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र  राज्य शासनाचे आदेशा  व्यतिरिक्त लॉकडाऊनबाबत कोणताही  आदेश  जारी केलेला नाही त्यामुळे लॉकडाऊन बाबत  कोणतीही अफवा पसरू नये अन्यथा संबंधितावर कारवाई  करण्यात येईल. मास्क न वापरल्यास 1 हजार रुपये दंड आकारले जाईल. या व्यतिरिक्त स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापती यांनी आवश्यकता वाटल्यास लोकांना  बरोबर घेऊन जनता कर्फ्युबाबत निर्णय घ्यावा. बीडीओ, तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी  माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहिमेबाबत गतीने  कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्‍या.  

From around the web