'ब्रेनली' वापरकर्त्यांच्या संख्येत विक्रमी वाढ
Apr 13, 2020, 16:09 IST
~ देशातील २२ दशलक्ष विद्यार्थी घेत आहेत 'ब्रेनली'द्वारे ऑनलाईन शिक्षण ~
मुंबई : कोव्हिड-१९ या आजाराच्या उद्रेकामुळे शाळा आणि कॉलेज अनिश्चित काळासाठी बंद असल्यामुळे जगभरातील विद्यार्थी ब्रेनलीसारख्या ऑनलाईन लर्निंग मंचाकडे वळत आहेत. विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठीची जगातील सर्वात मोठी ऑनलाइन कम्युनिटी ब्रेनलीने या दरम्यान आपल्या वापरकर्त्यांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली असून जागतिक स्तरावर मासिक २०० दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा गाठला आहे. तर भारतात ब्रेनलीने मासिक २२ दशलक्ष वापरकर्त्यांच्याची नोंद केली आहे.
ब्रेनलीची सीईओ आणि सह संस्थापक मायकल बोर्कोव्हस्की म्हणाले, 'या विनाशकारी जागतिक महामारीतही एक आशेचा किरण असू शकतो आणि शिक्षण क्षेत्र डिजिटल रुपात बदलण्यात हे महत्त्वाचे कारक ठरू शकते यावर आमचा विश्वास आहे. भारतात ऑनलाइन शिक्षण प्रणालीतील आव्हाने दूर करण्यासाठी एडटेक प्लॅटफॉर्मचा सतत विकास होत आहे. विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिक्षण उपलब्ध नसणे, तंत्रज्ञान/नेटवर्क सुलभरित्या न मिळणेइत्यादी आव्हाने असू शकतात. या अडचणी असल्यातरी एडटेक मंच ऑनलाइन शिक्षणाचा एक विस्तृत अनुभव देण्यासाठी वापरकर्त्यांना आकर्षित करत आहेत.'