नळदुर्गचा भुईकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला 

उस्मानाबाद जिल्ह्यातील संच ऐतिहासिक वास्तु, दुर्ग,किल्ले, स्मारके, संग्रहालये, लेणी  पर्यटकांसाठी खुले  -जिल्हाधिकारी 
 
नळदुर्गचा भुईकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला

उस्मानाबाद - कोरोना लॉकडाऊनमुळे  गेले आठ महिने बंद असलेला नळदुर्गचा भुईकोट किल्ला आता  पर्यटकांसाठी खुला झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तु, दुर्ग,किल्ले, स्मारके, संग्रहालये, लेणीही   पर्यटकांसाठी खुले  करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सूचित केले आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु (COVID-19)चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने भारत सरकार,महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांतील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तु, दुर्ग/किल्ले, स्मारके,संग्रहालये,लेणी इ.पर्यटकांसाठी खुले करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

     उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारे निर्गमित केलेल्या तसेच महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या व निर्गमित करण्यात येणा-या प्रमाणित कार्यपद्धती (SOP) चे पालन करणे तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर ठिकाणी आवाश्यक शारिरीक अंतर (Physical distance)बाळगणे,मास्क घालणे व वेळोवेळी Handwash/Sanitization करणे सर्व संबंधितांवर बंधनकारक राहील.

    सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.सदर आदेशाचे अंमलबजावणी दि.15डिसेंबर-2020 पासून लागू करण्यात येत आहे.असे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सूचित केले आहे.
 

From around the web