1 एप्रिलपासून 10 बँकांचे विलीनीकरण करून 4 बँका होणार

 
1 एप्रिलपासून 10 बँकांचे विलीनीकरण करून 4 बँका होणार

1 एप्रिलपासून देशातील एकूण दहा बँकांचे विलीनीकरण होणार आहे .  त्यानंतर त्यांचे केवळ चार बँकांमध्ये रूपांतर होईल.   यासह 2017 मध्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 27 वरून 12 वर करण्यात आली होती ,   अशा बँकांना 55 , 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत त्यांपैकी एकट्या पंजाब नॅशनल बँकेला 16 , 000 कोटी रुपये मिळतील. आता कोणत्या बँका विलीन केल्या जातील आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याचा तपशील जाणून घेऊ.

कुठल्या बॅंका कोणत्या बँकेत विलीन करणार
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत विलीन होतील. त्यानंतर ही बॅंक 17.95 लाख कोटी रुपये उलाढालीची आणि 11437 शाखा असलेली या देशातील दुसर्‍या क्रमांकाची बँक बनेल.

कॅनरा बँकेचे सिंडिकेट बँकेत विलीनीकरण
या दोन्ही बॅंकांच्या विलीनीकरणानंतर ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक बनेल. जिचे व्यवसायातील 15.20 लाख कोटी रुपयांचे भांडवल होऊन हीच्या देशात एकूण 10 , 324 शाखा सुरू राहतील.

युनियन बँक ऑफ इंडिया आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांची मिळून एक बँक तयार होईल. 14.59 लाख कोटी रुपयांची उलाढाल असणारी ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरेल आणि हिच्या देशभरात एकूण 9 , 609 शाखा होतील.
तसेच इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक यांचे विलीनीकरण होऊन एक बॅंक तयार होईल, जिचे व्यवसायातील भांडवल 8.08 लाख कोटी रुपये असेल.

ग्राहकांवर काय परिणाम होईल ?

  • खाते क्रमांक आणि ग्राहक आयडी नवीन असू शकतात, बँक विलीनीकरणानंतर आपल्याला नवीन खाते क्रमांक आणि ग्राहक आयडी मिळू शकेल.
  •  यासाठी तुमचा ईमेल पत्ता / मोबाइल नंबर बँक शाखेत अद्ययावत करावा लागेल, जेणेकरुन तुम्हाला बँकेकडून बदल झाल्याची माहिती मिळेल.
  •  तसेच आपली सर्व खाती एकाच ग्राहक आयडीमध्ये टॅग केली जाऊ शकतात.


बॅंकशाखा आणि एटीएमवर परिणाम
  • विलीनीकरणानंतर  बँकेच्या एका क्षेत्रात दोन शाखा असल्यास त्यातील एक बंद केली जाऊ शकते.
  •  एसआयपी किंवा कर्ज ईएमआयसाठी ग्राहकांना नवीन सूचना फॉर्म भरावा लागू शकतो.
  •  नवीन चेकबुकडेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड याबाबत समस्या होऊ शकते.
  •  मुदत ठेव (एफडी) किंवा आवर्ती ठेव (आरडी) वर व्याजात कोणताही बदल होणार नाही.

वाहन कर्जेगृहकर्जवैयक्तिक कर्ज इत्यादी कोणत्या व्याजदरावर घेतल्या गेलेल्या व्याज दरामध्ये कोणताही बदल होणार नाही.

दरम्यान,  आपण विविध व्यवहारासाठी आपला बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड दिला असेल तर ईसीएसद्वारे डिव्हिडंडचे ऑटो क्रेडिट पगाराचे ऑटो क्रेडिट   बिले  किंवा  शुल्कासाठी ऑटो डेबिट इ. अँकर बँकेच्या वित्तीय प्रणालीमध्ये इतर बँका पूर्णपणे विलीन झाल्या असतील तर असे व्यवहार सुरळित सुरू रहाण्यासाठी आपल्या बँक खात्याचा तपशील मजबूत करण्याची आवश्यकता भासू शकते. ज्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड देण्यात येईल त्यांना विविध तृतीय पक्षाच्या संस्थांसह हे तपशील व्यवस्थित करावे लागतील.

From around the web