ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी झारखंड येथून अटक

 
ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी झारखंड येथून अटक

उस्मानाबाद - “तुमचे 2 जी सिम कार्ड 4 जी करुन देतो, त्यासाठी तुमच्या एटीएम- डेबिट कार्डवरील क्रमांक सांगा, असे खोटे सांगून उस्मानाबादच्या एका व्यक्तीच्या बँक खात्यावरील   4 लाख ४९ हजार रक्कम अन्य खात्यात स्थलांतरीत करणाऱ्या एका हॅकरला झारखंड येथून अटक करण्यात आली आहे. 


उस्मानाबाद  शहरातील एका व्यक्तीस दि. 02.07.2020 रोजी एका अनोळखी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने, “तुमचे 2 जी सिम कार्ड 4 जी करुन देतो, त्यासाठी तुमच्या एटीएम- डेबिट कार्डवरील क्रमांक सांगा.” असे सांगितले.. यावर त्या व्यक्तीने तशी माहिती व आलेला ओटीपी संदेश वाचून खात्री न करता त्या अज्ञातास सांगीतल्याने त्यांच्या बँक  खात्यातील 4,49,806 ₹ रक्कम अन्य खात्यात स्थलांतरीत झाली होती. यावरुन आनंदनगर पो.ठा. गु.र.क्र. 267 / 2020 भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाणे, उस्मानाबाद करत आहे.

            सायबर पो.ठा. च्या पो.नि. श्रीमती अर्चना पाटील, सपोनि- श्री सचिन पंडीत, पोउपनि-  योगेश पवार, पोना- राहुल नाईकवाडी, गणेश जाधव, पोकॉ- शशिकांत हजारे, मकसुद काझी, अनिल भोसले, प्रकाश भोसले, आकाश तिळगुळे यांच्या पथकाने त्या अज्ञात व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक, समोरील व्यक्तीचा बँक खाते क्रमांक यांची तांत्रीक माहिती घेउन विश्लेषण केले. प्राप्त माहितीवरुन पोलीस पथकाने बोकोरो, राज्य- झारखंड येथे जाउन तेथील रहिवासी आरोपी- राहुलकुमार सुधीर महतो, वय 22 वर्षे,यास ताब्यात घेउन उस्मानाबाद येथे आणले असुन उर्वरीत तपास सुरु आहे.

From around the web