अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी covid-19 पॅकेज जाहीर करा

      - ॲड रेवण भोसले
 
अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी covid-19 पॅकेज जाहीर करा

उस्मानाबाद :महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीने अक्षरशः हाहाकार माजविला असून हातावर पोट असलेले मजूर ,कष्टकरी, श्रमजीवी ,शेतमजूर, सर्व क्षेत्रातील  हमाल ,माथाडी व कामगार ,फळे, भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, हात गाडावाले, सुतार ,वायरमन, प्लंबर इत्यादी सर्व प्रकारचे कारागीर, टॅक्‍सी, रिक्षावाले, धोबी ,सलून, कोळी इत्यादी स्वरूपाचे सर्व बलुतेदार घटक, छोटे दुकानदार ,मोलकरीन व हॉटेल्स इत्यादी सर्व सेवा उद्योग, सर्वसामान्य कर्मचारी व नोकरदार तसेच कनिष्ठ मध्यमवर्गीय यांचा रोजगार संपुष्टात आल्याने कोरोना नव्हे तर भूक बळीने मजूर मरण्याची भीती या गोरगरीब, सर्वसामान्य वर्गाला सतावत आहे. पीक वाया गेल्यामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे. औद्योगिक क्षेत्रातही पुन्हा उभे राहणे हे सर्व सूक्ष्म, लघु व मध्यम व काही प्रमाणात मोठ्या उद्योगांनाही प्रचंड मोठे आव्हान उभे राहिले आहे आणि राज्याचा आर्थिक व औद्योगिक गाडा ई. स. सन 2021 मध्येही रुळावर येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. त्यामुळे राज्यातील 80 टक्के जनता हलाखीत जीवन जगत आहे. त्यांची आज उदरनिर्वाह करताना दमछाक होत आहे. उपासमारीची भीती सतावत आहे .त्यामुळे राज्य सरकारने राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी covid-19 पॅकेज तात्काळ जाहीर करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .

आज राज्यातील 80 टक्के जनता राज्य सरकारकडे अपेक्षेने पाहत आहे .या जनतेला व दुर्बल घटकांना थेट मदत करणे ,पॅकेज देणे आवश्यक आहे. या नैसर्गिक व असाधारण आपत्तीमध्ये राज्य सरकारने काय मदत केली असा प्रश्न राज्याच्या  जनतेमध्ये उभा राहण्यापूर्वीच सरकारने निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे .राज्य सरकारने मागेपुढे न पाहता तातडीने या सर्व घटकांना मदत करणारे भरीव पॅकेज जाहीर करावे अशी जनता दल सेक्युलर पक्षाची मागणी आहे. ही वेळ आर्थिक दृष्ट्या विचार करत बसण्याची नाही तसेच राज्याचा खजिना रिता आहे असे म्हणण्याचीही परवानगी नसते .संत दामाजीपंत ,संत तुकाराम महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या आदर्शानुसार रयतेला जगविणे व पुन्हा उभे करणे महत्वाचे आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे .रुग्णासाठी खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात वैद्यकीय सामग्रीचा तुटवडा तसेच कोविड लस, ऑक्सिजन व संबंधित उपकरणांचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतच आहे .त्यामुळे उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे .कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. कोरूनापेक्षा आर्थिक संकट व हतबलतेने नागरिक त्रस्त आहेत .त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने गोरगरिबांना अन्नधान्य पुरवठा व थेट आर्थिक मदत देण्याची अत्यंत गरज असल्याचे स्पष्ट  मतही ॲड भोसले यांनी व्यक्त केले आहे.

 

From around the web