उस्मानाबादेत 13 के एल लिक्विड ऑक्सिजन टँक दाखल 

संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली
 
s

उस्मानाबाद-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. 

 या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयात आज 13 के एल लिक्विड ऑक्सिजन टँक (LMO) दाखल झाला आहे. टँक बसवण्याचे काम अंतिम टप्यात आहे .  कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या  दरम्यातन मे महिन्यात   14 मे 2021 रोजी लिक्विेड ऑक्सीकजनची मागणी 19.5 KL  प्रतीदिन इतकी वाढली होती. जिल्हायाला होणारा ऑक्सीकजन पुरवठा हा मुख्यतः पुणे, हैदराबाद सारख्या शहरातून  होत असल्याने आणिबाणीच्या  प्रसंगी पुरेसा साठा ( Backup storage ) तयार असणे आवश्यक आहे. त्या नुसार जिल्ह्यात  कार्यवाही केली जात आहे. 

  लिक्विड ऑक्सीजन टँकचे काम येथील जिल्हा रुग्णायलयात सुरू असून त्याची क्षमता-10 KL आहे. सद्यस्थिती हा टॅंक कार्यान्वित आहे .तामलवाडी येतील गोरज गॅसची क्षमता -11 KL हा खाजगी आहे . हा सध्या  सुरु आहे. येथील जिल्हा रुग्णालयातील टॅन्कची  क्षमता -13 KL असून सद्यस्थित  टँक प्राप्त झाला आहे. उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचे कार्यान्वायन 10 दिवसात होणार आहे. तुळजापूर येथील  उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅन्कची  क्षमता -13 KL असून त्याची उभारणी सुरू आहे. येत्या  15 ऑगस्टपर्यंत तो कार्यान्वित होण्याची  अपेक्षा आहे. या सर्व ठिकाणावरून जिल्ह्यास  एकूण-47 KL. ऑक्सिजन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होणार आहे.

  या व्यतिरिक्त डयुरा सिलेंडर्स भरण्यासाठी 20 KL क्षमतेचा साठवणूक टँक ची  प्राथमिक प्रक्रिया सुरु आहे. हवेतून ऑक्सीकजन तयार करण्याचे  प्रकल्प. (PSA ) LMO Plant च्या तुलनेत या प्रकल्पांची क्षमता कमी असते. मात्र आणिबाणीच्या परिस्थितीत रुग्णालयांना जोडणी केलेले हे प्रकल्पा महत्वाषचे ठरतात. या प्रकल्पाच्या उभारणीचे कामही जिल्ह्यात सुरू आहे . या  प्रकल्प जिल्हा रुग्णा्लयात सुरू असून त्याची  क्षमता 300 LPM आहे. उमरगा येथील उपजिल्हा रुग्णाiलयात हा प्रकल्प सुरू असून त्याची  क्षमता-420 LPM आहे. परंडा येथील  उपजिल्हा रुग्णालयात (Tata Powers - CSR) क्षमता-500 LPM  च्या  प्रकल्पाच्या  यंत्रसामग्री उभारणीचे काम  पूर्ण आहे. जोडणी व चाचणी घेण्याचे काम बाकी आहे. कळंब येतील उपजिल्हात रुग्णालयात प्रकल्पाची  (Americares Foundation ) क्षमता-600 LPM असून   CSR चे पत्र प्राप्त झाले आहे . जिल्हा  प्रशासन सिव्हीबल वर्क आणि  इलेक्ट्रीकल  वर्क करणार आहे.

d

तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णा्लयातील प्रकल्पाची क्षमता-500 LPM असून  MIDC , महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्रकल्प मंजूर केला आहे.या व्यरतिरिक्तत  Path Foundation व Google कंपनीने जिल्हा  रुग्णाालयाकरिता 1000 LPM क्षमतेचा CSR प्रकल्प मंजूर केला आहे.जिल्ह्यात ऑक्सीजन सिलेंडर्स शासकीय सध्या 969 जंबो सिलेंडर उपलब्ध आहेत तर  50008 ड्युरा सिलेंडरची नव्याने खरेदी प्रक्रिया  सुरु आहे . खाजगी रुग्णालयात सध्या  1615 जंबो ऑक्सिजन  सिलेंडर आणि  4 डयुरा सिलेंडर् आहेत .      

    ऑक्सीजन कॉन्ससन्ट्रेटर्स  : 
    
 जिल्हात रुग्णालय ,4 उपजिल्हा रुग्णालय, 6 ग्रामीण रुग्णा्लय , 44 PHC मिळून एकुण 401 ऑक्सीजन  कॉन्सट्रेटर्स खरेदी व सामाजिक संस्थारकडून मदत स्वूरुपात प्राप्ता झाले असून 107 कॉन्सन्ट्रेटर्स नव्याने उपलब्धस करुन घेणे अपेक्षित आहे. ऑक्सीतजन कॉन्सझन्ट्रेनटर्स हे सौम्य् व मध्यम स्वारुपात ऑक्सी्जन लागणा-या रुग्णांसाठी उपयोगी ठरतात. 

खाजगी संस्थांच्याठ माध्यसमातून  ऑक्सिजन  निर्मिती प्रकल्पम : 

 धाराशिव साखर कारखाना तालुका कळंब सद्यस्थितीत प्रकल्प  कार्यान्वि-त. 6 KL/ दिन क्षमता. नॅचरल शुगर लिमिटेड तालुका कळंब सद्यस्थिती-1 KL/ दिन क्षमता. दि.7जुलै-2021 पासून कार्यान्विेत.प्रकल्प- रुपामाता अॅग्रोटेक तालुका उस्मानाबाद सद्यस्थिती (1 KL) यंत्रसामग्री प्राप्त असून दि. 25.जुलै 2021 पर्यंत प्रकल्प् पूर्ण होण्यची शक्यकता आहे. भैरवनाथ साखर कारखाना तालुका परंडा सद्यस्थिती यंत्र जोडणी सुरु (2 KL). प्रकल्प- कान्हास इंडस्ट्री ज व मेडिकल गॅसेस तालुका उमरगा सद्यस्थिती 550 सिलेंडर्स / दिन क्षमतेचा प्रकल्पप उभारणी सुरु.

 या संदर्भात खाजगी प्रकल्पाउबाबत महाव्यवस्थारपक जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद यांच्या स्तरावरुन  पाठपुरावा सुरु आहे.या सर्व शासकीय व खाजगी प्रकल्पांच्या माध्यदमातून ऑक्सीजन पुरवठा सुरळीत करण्यासचे प्रयत्न सुरु आहेत. याच जोडीला तालुक्यातील तहसिलदार, वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी दि. 22 जुलै-2021 पर्यंत ऑक्सीजन व्यसवस्थावपन आराखडे, रुग्णालयांची क्षमता व गरज लक्षात घेऊन तयार करण्याचे आदेश जिल्हांधिका-यांनी दिले आहेत.

कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर  मेडिकल ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्ह्यास स्वयंपूर्ण करण्याची तयारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती आणि आरोग्य विभागाने केली आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात काही ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण झाले आहे  तर काही ठिकाणचे काम सुरू झाले आहे . याही ऑक्सिजन प्लांटचे काम लवकरच पूर्ण होईल,असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केला आहे . 

From around the web