धाराशिव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या खासगी वाहनास पाचशे रुपये दंड  

खासगी वाहनावर  'महाराष्ट्र शासन' नेमप्लेट  लावणे आले अंगलट 
 
s

धाराशिव - धाराशिव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांना शासकीय वाहन नसल्याने त्या खासगी वाहन भाडेतत्वावर वापरत होत्या. पण या  खासगी वाहनावर 'महाराष्ट्र शासन' नेमप्लेट लावता येत नसतानाही त्या वाहनावर महाराष्ट्र शासन ही  नेमप्लेट लावण्यात आली होती. ही बाब सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या निर्दर्शनास येताच, पालिकेच्या आवारातच वाहतूक पोलिसाना बोलावून, पाचशे रुपये दंड या वाहन धारकास करण्यात आला. 

त्याचे असे झाले, धाराशिव नगर पालिकेची ‘अ‍ॅम्बेसेडर’ कार भंगारात निघाल्याने मुख्याधिकारी वसुधा फड या शासकीय आणि खासगी कामासाठी खासगी वाहन (  कार  क्र . एम. एच २५ आर ९३६९)  या भाडेतत्वावर वापरत होत्या. या खासगी वाहनावर 'महाराष्ट्र शासन' नेमप्लेट लावता येत नसतानाही त्या वाहनावर महाराष्ट्र शासन ही  नेमप्लेट लावण्यात आली होती.

ही बाब सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांना लक्षात येताच, आज ( शुक्रवारी ) दुपारी  वाहतूक पोलिसाना नगर पालिका आवारात   पाचारण करण्यात आले आणि त्यांना ही  बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर या वाहन धारकास पाचशे रुपये दंड आकारण्यात आला. मुख्यधिकारी वापरत असलेल्या या वाहनास पाचशे रुपये दंड झाल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. 

वास्तविक सदर खासगी  वाहन मुख्यधिकारी  वसुधा फड  या वापरत होत्या आणि दंड मात्र बिचाऱ्या त्या  धारकास करण्यात आल्याने शहरात उलट  सुलट चर्चा सुरु आहे. तथापि, मुख्यधिकारी वसुधा फड यांचा या सर्व प्रकारामुळे चांगलाच पाणउतारा झाला आहे.

From around the web