आरोग्य महामेळाव्यात जगप्रसिध्द ऱ्हदय रोग तज्ञ डॉ.मनोज अग्नेय यांनी केली हजारो रुग्णांची मोफत तपासणी
उस्मानाबाद - परांडा येथे आरोग्य महामेळाव्याच्या उदघाटन समारंभाप्रसंगी एक नाव प्रामुख्याने समोर आले ते म्हणजे डॉ.मनोज अग्नेय, यांचा 31 वर्षापेक्षा अधिक काळाचा प्रसिध्द ऱ्हदय विकार तज्ज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय अनुभव विशेषतः हृदय प्रत्यारोपण यात त्यांचा विशेष हातखंडा..अशा डॉक्टर आणि त्यांच्या चमुने मोफत तपासणी केली आहे.
डॉ. मनोज अग्नेय हे 1991 मध्ये सर जेजे हॉस्पीटल ॲन्ड ग्रांट मेडिकल कॉलेज मुंबई येथून cardiovascular andthoracic surgery boards उत्तीर्ण केल्यानंतर 1995 मध्ये अमेरिकेतील पोर्टलॅंड येथील Oregon हेल्थ सायन्स विद्यापीठ येथे प्रौढ आणि बालरोग हृदय शस्त्रक्रीया आणि कार्डियो पलमोनरी प्रत्यारोपनामध्ये महत्वपूर्ण कौशल्य व अंतर्द्दष्टी प्राप्त केली. तसेच हदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाच्या पुढील अनुभवासाठी इंगलंड येथील मँचेस्टर येथे काही वर्ष प्रॉक्टीस केली एकंदरीत भारत देशात ऱ्हदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणात सर्वात मोठा अनुभव आसल्याचा मानही त्यांच्याकडे आहे.
अमेरिका आणि इंगलंड मध्ये 8 वर्ष सेवा केल्यानंतर ते मुंबईला परतले आणि अनेक मोठया खासगी रुग्णालयामध्ये ऱ्हदयाचे अनेक गुंतागुंतीचे प्रात्यारोपण विशेष म्हणजे लहान मुलांनी ऱ्हदय प्रत्यारोपणाची प्रकरणे डॉ. अग्नेय यांनी अत्यंत कुशलतेने यशस्वीरित्या पार पाडली डॉ. अग्नेय यांनी बी.के. ग्लोबल क्रिटीकेअर एशिया आणि आरोग्य निधी अशा जागतिक दर्जांच्या रुग्णालयांमध्ये त्यांनी लाखो रुग्णांची सेवा केली आहे. त्यांचा स्वत:चा क्लीनिक मुंबईच्या जुहू येथील गुलमोहर रोडवर praxis healthcare नावाने आहे. त्याचा ई-मेल पत्ता mannoja@yahoo.com आहे. परंडा येथील महाआरोग्य शिबीरात त्यांनी असंख्य रुग्णांची तपासणी आणि प्राथमिक उपचार ही दिले- महाराष्ट्र राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी आयोजित केलेल्या या आरोग्य महामेळाव्यात देशातील विख्यात आणि नामवंत डॉक्टररांनी लाखो रुग्णांची तपासणी केली यावेळी रुग्णांना मोफत औषधोपचार आणि आवश्यक असल्यास पुढील शस्त्रक्रीयाही शासनाकडून देण्यात येणार येणार असल्याचे सांगितले.