दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात वांगी गावाने ठेवला आदर्श ( Video )

एक घर, दोन झाडे याप्रमाणे ४ हजार ७०० झाडांची जोपासना  / गावाची लोकसंख्या २२०० आणि झाडे ३८०० नारळाची झाडे 
 
sd
मिनी कोकण म्हणून वांगी गावाची ओळख 

उस्मानाबाद- दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात वांगी ( ता. भूम ) गावाने ठेवला आदर्श ठेवला आहे. एक घर, दोन झाडे याप्रमाणे ४ हजार ७०० झाडांची जोपासना करण्यात आली आहे. गावाची लोकसंख्या २२०० आणि झाडे ३८०० नारळाची झाडे आहेत. मिनी कोकण म्हणून वांगी गावाची ओळख निर्मांण झाली आहे. 


अवघा एक टक्का वनक्षेत्र असणाऱ्या दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात चक्क  झाडे जोपासणारे गाव  म्हणून वांगी गावाची ओळख निर्माण झाली आहे. एक घर दोन झाडे असा उपक्रम राबवत  2200 लोकवस्ती असलेल्या  वांगी गावात झाडे जोपासण्यात आली आहेत.  गावात हिरवीगार झाडे पाहिली की थोडा वेळ का असेना कोकणातील गावात आल्याचा आनंद येथे होत आहे. 


कमी पर्जन्यमान त्यात ओसाड माळरान व अवघे एक टक्का वनक्षेत्र असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वांगी  गाव .या गावाला ना कुठला इतिहास ना कुठली ओळख पण एक घर दोन झाडे जोपसण्याच्या या उपक्रमा मुळे हे गाव चर्चेत आले आहे अवघी 2200 लोकवस्ती तरी पण झाडे मात्र चार हजार आठशे 5 वर्षा पूर्वी पडलेल्या दुष्काळात गावातील नागरिकांनी एक घर दोन झाडे जोपसण्याचा संकल्प केला व आज बघता बघता तो संकल्प पूर्ण होऊन गाव हिरवळीने नटले आहे 


वांगी गावात प्रवेश केला की रस्त्याच्या दुतर्फा झाडे आपल्या स्वागतासाठी कायम डौलत उभा असतात,  गावातील प्रत्येक घरासमोर अनेक झाडे दिसतात त्यात प्रामुख्याने नारळ ,चिंच ,लिंब सह अनेक झाडे उभा दिसतात ही झाडे स्वतः हुन आलेली नाहीत तर त्यासाठी गावकऱ्यांनी मेहनत घेतली असून एक घर दोन झाडे जोपसण्याचा उपक्रम हाती घेतला व तो पूर्ण ही केला त्यामुळे च गावात गावकर्यांच्या एकी च्या जोरावरच नुसते झाडेच नाहीत तर अनेक वेगवेगळी विकास कामे झाले असून त्याला शासनाने पुरस्कार दिल्याचे गावकरी सांगत आहेत


कोरोनाच्या  संकट काळात लोकांना ऑक्सिजनचे महत्व मोठ्या प्रमाणात पटले देखील . यानंतर लोकांनी झाडे लावण्याच्या मोहीम देखील हाती घेतल्या वांगी गावाने मात्र संकट ची पावले अगोदरच ओळखली व वृक्ष संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली ती ही शासनाच्या मदतीविना हे कौतुक स्पद असून झाडे लावण्याच्या नावाखाली लाखो रुपये लुबडणाऱ्या साठी देखील हे गाव आदर्श ठरत आहे. 

From around the web