उस्मानाबादला रेल्वे असून अडचण , नसून खोळंबा . ..

कोच इंडिकेटर नसल्यामुळे प्रवाश्यांची धावपळ
 
osmanabad
उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवर अनेक समस्या

उस्मानाबाद - एसटीच्या संपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही,  कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत  तर सरकारचा  वेळकाढूपणा सुरु आहे. यात सर्वसामान्य प्रवासी मात्र भरडला जात आहे. उस्मानाबादहून पुणे-  मुंबई ला जाण्यासाठी  एकमेव पर्याय म्हणजे रेल्वे ... पण ऑडटाईममुळे रेल्वे असून अडचण नसून खोळंबा  बनली आहे. 

उस्मानाबादहून  पुणे - मुंबईला जाण्यासाठी  आणि येण्यासाठी लातूर ते मुंबई , नांदेड ते पनवेल आणि हैद्राबाद ते हडपसर या तीनच  रेल्वे सुरु आहेत. नांदेड ते पनवेल आणि हैद्राबाद ते हडपसर या रेल्वेची उस्मानाबादला येण्याची वेळ पहाटेची असल्यामुळे सहसा या रेल्वेने  कुणी पुण्याला जात नाही. पूर्वी प्रमाणे त्याची वेळ सकाळी आठची करावी अशी मागणी आहे. तसेच कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे गाडया पुरवत सुरु कराव्यात अशी मागणी आहे. 

तसेच रेल्वे  स्टेशनवर रेल्वे आल्यानंतर प्रवाशाची खूप धावपळ होते, कारण याठिकाणी अजूनही कोच इंडिकेटर बसवण्यात आलेले  नाहीत, त्यामुळे कोणता डबा कोणत्या ठिकाणी लागणार आहे , हे कळतच  नाही. 

तसेच प्लेट फॉर्म नंबर दोनच्या कठड्याची उंची खूप कमी आहे. याठिकाणी  रेल्वेत चढताना आणि  उतरताना लहान मुले आणि वृद्ध माणसांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. 

एक तर उस्मानाबाद रेल्वे स्टेशन उस्मानाबादपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्टेशनवर कसल्याही सुविधा नाहीत. पावसाळयात याठिकाणी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व समस्या केव्हा सुटणार ?  रेल्वे हे एक कोडेच आहे. 

या आहेत रेल्वे प्रवाश्यांच्या मागण्या 

१) उस्मानाबाद आणि बार्शी रेल्वे स्टेशनवर कोच इंडिकेटर बसविणेबाबत :-

  उस्मानाबाद आणि बार्शी रेल्वे स्थानकावर अद्यापही कोच इंडिकेटर बसविण्यात आलेले नाहीयेत. या दोन्ही स्थानकावर वरिष्ठ नागरिक,महिला,दिव्यांग, लहान मुले घेऊन प्रवास करणारे प्रवासी  इत्यादी, प्रवास करत असतात या दोन्ही स्टेशनवर येणाऱ्या गाड्या ह्या फक्त दोन मिनिटे थांबत असून , कोच इंडिकेटर बसविण्यात आले नसल्याने आपला कोच नेमका कुठे येणार हेच माहिती नसते, त्यामुळे प्रवाशांना खूप धावपळ करत गाडी पकडावी लागते.गाडी सुटण्याची भीती सल्याने प्रवासी धावपळ करतात, याविषयी वारंवार तक्रार करूनही मध्ये रेल्वे प्रशासनाने अद्याप या दोन्ही स्थानकावर कोच इंडिकेटर बसविलेले नाहीयेत. 


२) हैद्राबाद-हडपसर या गाडीची वेळ पूर्वीप्रमाणे तसेच हि गाडी दररोज करणेबाबत:- 

  पूर्वीची हैद्राबाद पुणे हि गाडी सध्या हैदराबाद हडपसर अशी धावत आहे परंतु ही गाडी पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना सकाळची एकमेव गाडी आहे परंतु या गाडीची वेळ हि खूपच लवकर पहाटे  ५.१० वाजता असल्याने खेडोपाड्यात राहणारे अनेक प्रवासी हैराण होत आहेत, त्यामुळे या गाडीला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाहीये. प्रवाशांनी अशी  मागणी आहे कि या गाडीची वेळ पूर्वीप्रमाणे उस्मानाबाद या ठिकाणी सकाळी ठीक ८ वाजता करण्यात यावी. जेणेकरून या गाडीचा लाभ जास्तीत जास्त लोक घेऊ शकतील. आपण यापूर्वीही पुणे-लातूर इंटरसिटी गाडीची मागणी वारंवार करत असून, तत्पूर्वी हैद्राबाद-हडपसर हि गाडी दररोज सुरु झाल्यास अनेक प्रवाशांना दिलासा मिळेल. 


३) पनवेल-नांदेड गाडीला बार्शी रेल्वे स्थानकावर थांबा देणेबाबत:-

   बार्शी रेल्वे स्थानकावर गेली कित्येक दिवस या दोन्ही गाड्यांचे थांबे उडविण्यात आले आहेत. प्रवासी सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेकवेळा रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही काहीतरी तांत्रिक करणे देऊन हा विषय टाळाटाळ करण्याचे काम सोलापूर मंडळ,रेल्वे प्रशासन करीत आहे. यामुळे बार्शी येथील अनेक प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. विशेष म्हणजे हि गाडी क्रॉसिंगला स्टेशननजीक थांबवली जाते परंतु अधिकृत थांबा दिला जात नाही. रेल्वेच्या या लहरी कारभारामुळे अनेक  प्रवाशी हैराण होत आहेत. 

४) बार्शी रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज विषयक:-
 
 गेली अनेक वर्ष बार्शी रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण करण्यात आले नाहीये. याविषयी असंख्य प्रवाशांनी  तक्रार करूनही मध्ये रेल्वे प्रशासन, सोलापूर मंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य करत असल्याचे असे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांना नाईलाजाने रेल्वे रुळावरून क्रॉस करून एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जावे लागते,त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. 


५) कोव्हीड काळात बंद झालेल्या पँसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्या पूर्ववत करणेबाबत:-

 रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या विनंतीवरून कोव्हीड काळात कोरोनाचे संकट वाढू नये याकरिता जिल्हा अंतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता.आता कोरोनाचे संकट कमी झाले असून परिस्थिती पूर्ववत झाल्याचे सरकारच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे तसेच अनेक कोरोना काळातले अनेक निर्बंध हटविण्यात आले आहेत. परंतु कोव्हीड काळात बंद झालेल्या पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्या अद्यापही पूर्ववत करण्यात आलेल्या नाहीयेत, यद्यपि महाराष्ट्रात गेली कित्येक महिने एस टी कर्मचारी संपावर आहेत त्यामुळे बससेवा पूर्णपणे ठप्प आहे त्यामुळे अनेक प्रवाशांना नाईलाजाने अधिकचे पैसे मोजून खाजगी वाहनाने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. परंतु रेल्वेने काही गाड्या प्रवाशांचा योग्य तो प्रतिसाद नसल्याचे कारण दाखवत काही गाड्या कायमस्वरूपी बंद पाडण्याचे षडयंत्र केल्याचे दिसून येते. 


६) लातूर-यशवंतपूर हि साप्ताहिक गाडी पंढरपूर किंवा कुर्डुवाडी स्थानकापर्यंत वाढविणेबाबत:-  

   लातूर यशवंतपूर हि साप्ताहिक एक्सप्रेस गाडी सध्या लातूर स्थानकापर्यंत चालविण्यात येत आहे. हि गाडी लातूर स्थानकावरून हि गाडी सुटून बिदरमार्गे यशवंतपूर (बंगळुरू) या स्थानकापर्यंत आठवड्यातून तीन दिवस चालविली जात आहे. या गाडीला प्रवाशांचा म्हणावा तास प्रतिसाद नसल्याचे दिसून येते त्यामुळे लातूर मिरज रेल्वे मार्गावरील पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी आणि उस्मानाबाद येथील प्रवाशांना या गाडीने प्रवास करता यावा याकरिता हि गाडी पंढरपूर किंवा कुर्डुवाडी स्थानकापर्यंत वाढवावी याचे कारण पंढरपूर हे भारतातील महत्वाचे देवस्थान असून देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी या ठिकाणाला दरवर्षी येतात. तसेच कुर्डुवाडी हे रेल्वे स्थानक अतिशय महत्वाचे जंक्शन असून या ठिकाणहून देशाच्या विविध भागात रेल्वे गाड्या जातात, त्यामुळे या गाडीला प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता जास्त असल्याने, हि गाडी नियमित करा अशी मागणी रेल्वे प्रशासनकडे करता येईल.आपण या विषयी योग्य तो पत्रव्यवहार करून हि गाडी कुर्डुवाडी किंवा पंढरपूर स्थानकापर्यंत वाढविण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे आहे. 

From around the web