आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून केराची टोपली 

 
zp obd

उस्मानाबाद  - प्रतिनियुक्ती / सेवा वर्ग केलेल्या वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवा वर्ग / प्रतिनियुक्ती आदेश रद्द करून मूळ पदस्थापनेवर सेवा परत करण्याचा आदेश लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमल चामले यांनी देऊनही  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एकाही कर्मचाऱ्यांची  प्रतिनियुक्ती रद्द न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उस्मानाबादच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लातूरच्या उपसंचालकांची पूर्व परवानगी न घेता परस्पर  प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही वैद्यकीय अधिकारी तसेच 20 ते 25 कर्मचारी यांची प्रतिनियुक्ती ( क्रीम पोस्टिंग ) केली होती. 

जिथे मेवा मिळतो तेथे मेवा घेऊन ही प्रतिनियुक्ती देण्यात आली होती, एका प्रतिनियुक्तीसाठी किती रक्कम घेण्यात आली याची देखील जिल्हा परिषदेच्या आवारात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे, प्रतिनियुक्ती तसेच बदल्या प्रकरणात मोठा घोळ सुरू असून आलेल्या लाचेच्या रकमेवरून दोन कर्मचाऱ्यात कार्यालयातच फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचेही पहावयास मिळाले आहे.

दरम्यान प्रतिनियुक्ती / सेवा वर्ग केलेल्या वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवा वर्ग / प्रतिनियुक्ती आदेश रद्द करून मूळ पदस्थापनेवर सेवा परत करण्याचा आदेश लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमल चामले यांनी देऊनही उस्मानाबादच्या  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एकाही कर्मचाऱ्यांस मूळ पदावर न पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

s

From around the web