उस्मानाबाद राष्ट्रवादी महिला काँग्रेसमधील वाद थेट शरद पवार यांच्या दरबारी 

निष्ठावंतांना राष्ट्रवादीत डावलले जाणार नाही ! ‘त्या’ नियुक्तीची दखल घेतली जाईल - खा.शरद पवार
 
s
पक्षात राहून पक्षाची बदनामी करणाऱ्या वर पक्षश्रेष्ठींनी कठोर कारवाई करावी - ऍड. प्रज्ञा खोसरे 

उस्मानाबाद -राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना कदापि डावलले जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातात. त्यामुळे सर्व महिला पदाधिकार्‍यांनी पूर्वीप्रमाणेच एकजुटीने पक्षाचे काम करावे. ‘त्या’ नियुक्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्याची माहिती उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकार्‍यांनी दिली.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांची कुचंबना होत असल्याने आम्ही सामूहिक राजीनामे देणार असल्याचे जिल्ह्यातील अनेक महिला पदाधिकार्‍यांनी दि. 16 मार्च रोजी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. निष्ठावंतांना पक्षात स्थान राहिले नसल्याची खंतही यावेळी महिला पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर महिला पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने बारामती येथे आज (दि.19) सकाळी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. शिष्टमंडळासमवेत चर्चा करताना खासदार पवार यांनी महिला पदाधिकार्‍यांनी पूर्ववत पक्षात कार्यरत रहावे असे सांगून निष्ठावंतांना कदापि डाववले जाणार नाही, अशी ग्वाही दिल्याची माहिती अ‍ॅड.मंजुषा मगर व सुरेखा जाधव यांनी दिली. तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

s


खा. शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आम्ही यापुढे  शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक जोमाने काम करणार असल्याचे अ‍ॅड.मंजुषा मगर-माडजे व सौ.सुरेखा जाधव यांनी सांगितले. शिष्टमंडळात सौ.वंदना डोके, सौ.सलमा सौदागर, सौ.अमृता दुधाळ, सौ.प्रीती गायकवाड, सौ.स्वाती भातलवंडे, कु.ऋतुजा भिसे, सौ.अफसारा पठाण, सौ.ज्योती माळाळे, सौ.सुनंदा भोसले, सौ.मनीषा साळुंके, सौ.बालाश्री पवार,सौ. शोभा मस्के यांचा समावेश होता.


पक्षात राहून पक्षाची बदनामी करणाऱ्या वर पक्षश्रेष्ठींनी कठोर कारवाई करावी - ऍड. प्रज्ञा खोसरे 

s

               मी स्वतः गेली दोन वर्ष झाले उस्मानाबाद महिला निरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळत आहे, माजी जिल्हाध्यक्ष मंजुषा मगर यांना वारंवार सांगूनही महिलांचे कुठलेही संघटन वाढलेले नाही. आणि त्यांनी स्वतः 27 नोव्हेंबर 2021 रोजी माझ्या घरगुती कारणामुळे राजीनामा देत आहे असे व्हाट्सअप द्वारे कळवले आहे, तसा पुरावा ही माझ्याकडे आहे त्यानंतर आपण त्यांना तीन महिने कालावधी दिला तरीही त्यांच्यात कसलाच बदल झालेला आढळून आलेला नाही.त्यानंतर आपण पक्ष हितासाठी आणि उस्मानाबाद मधील महिलांचे संघटन वाढवण्यासाठी यशस्विनी सामाजिक काम करणाऱ्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मनीषा राखुंडे यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष पद देण्यात आलेले आहे.

          यामध्ये कोणाचेही कोणतेही पद काढून घेतलेले नाही तरीसुद्धा प्रेस कॉन्फरन्सद्वारे पक्षात राहून पक्षाची विनाकारण बदनामी चालू आहे प्रभारी हे तात्पुरते पद असते,हे प्रत्येक समजदार व्यक्तीला कळते त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्षांनी संघटन करण्यासाठी तालुक्यात जाव लागते असे त्यांना सांगितले तर "गाडी कोण देणार" असे त्यांचे उत्तर असायचे ,प्रत्येक कार्यक्रमाला अनुउपस्थित असण्याचे हे सगळं माझ्याकडे पुराव्यासकट आहे तसेच पक्ष अभिप्राय, सुप्रिय स्वाधार आभियान ,बूथ कमिट्या हे महिलांच्या हिताचे सामाजिक उपक्रम एकही राबवलेले नाही. गेली काही दिवसात कोणता सामाजिक उपक्रम न घेता अशा अशाप्रकारे पक्षाची नाहक बदनामी चालू आहे हे आम्ही कदापी मान्य करणार नाही.नवीन चेहऱ्याला संधी देऊन आपण ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहावे हे  शरदचंद्र पवार साहेबांच्या ध्येय धोरणावर आपली वाटचाल पाहिजे,

        खोट्या पद्धतीने पक्षाची नाहक बदनामी सहन केली जाणार नाही. प्रेस कॉन्फरन्स ला मागे आठ महिला आणि बोलताना 13 ,14 हा आकडा आणि वीस महिलांचे राजीनामे आणि आपले कार्यकारनी 15 महिलांची हे विनाकारण चालू आहे त्यामुळे माझी पक्षाचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांना विनंती आहे,अशा खोटारड्या आणि पक्षाची बदनामी करणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई करण्यात यावी..

-  ऍड. प्रज्ञा खोसरे , निरीक्षक उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी महिला,काँग्रेस 

From around the web