कौटुंबिक न्यायालयात  तडजोड , तीन जणांचे संसार पुन्हा जुळले

उस्मानाबाद  जिल्हा न्याययलयातील लोकअदालतीत 9 कोटी 72 लाख 64 हजार रुपयांची तडजोड
 
d

उस्मानाबाद : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार येथील जिल्हा  न्यायालयात काल घेण्यात  आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत 9 कोटी 72 लाख 64 हजार 704 रुपयांच्या प्रकरणांमध्ये तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच कौटुबिक न्यायालयातील तीन प्रकरणात तडजोड घडवण्यात  यश आल्याने त्यांचे संसार पुन्हा जुळले आहेत. विशेष म्हणजे हे कालच्या लोक अदालतीचे वैशिष्टय म्हणावे लागेल

          संपूर्ण जिल्ह्यामध्ये काल राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. उस्मानाबाद येथील जिल्हा न्यायालयात सकाळी दहा वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या.के. आर. पेठकर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने लोकअदालतीचे  उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली डंबे-आवले,बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे सदस्य एम. एस. पाटील, जि. न्या-1 राजेश एस. गुप्ता, जि.न्या-2 के. ए. बागी, जि. न्या-3 व्ही. जे. मोहिते, जि. न्या-4जी.पी. अग्रवाल, तदर्थ जिल्हा न्यायाधीश १पी. एच. कर्वे, , जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर, तसेच जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस. आर. मुंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत एस यादव, सर्व न्यायिक अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, बँक अधिकारी, ग्रामसेवक, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

d

          उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक ए. डी. घुले यांनी केले. या लोकअदालतीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पक्षकारांना आणि उपस्थित सर्वांना सामाजिक अंतर ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

तीन संसार पुन्हा बहरणार

येथील कौटुंबिक न्यायालयातील हिंदू विवाह कायद्यांतर्गत दाखल तीन प्रकरणे लोक न्यायालयात तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. परिणामी संबंधित पतींने त्यांच्या पत्नीस नांदावयास घेवून गेले.अर्ज क्रमांक ४६/२२ हे प्रकरण दि.०१एप्रिल२०२२ रोजी अर्जदार यांनी, त्यांची पत्नी यांना नांदावयास यावे म्हणून दाखल केले होते. या प्रकरणांतील पती-पत्नी हे दि.१५ फेब्रुवारी २०२२ पासून एकमेंकापासून विभक्त रहात होते. या प्रकरणांत लोकन्यायालयात तडजोड झाली. त्यामुळे पतीने त्यांच्या पत्नीस नांदावयास नेले आहे.

 अर्ज क्रमांक १०/२२ या प्रकरणात दि ०३ फेब्रुवारी २०२२ रोजी अर्जदाराने त्यांच्या पतीपासून घटस्फोट मिळावा किंवा नांदावयास घेवून जावे म्हणून अर्ज दाखल केला होता. या प्रकरणातील पती-पत्नी दि १० जानेवारी २०२२ पासून विभक्त राहत होते. याही प्रकरणात लोकन्यायालयात सांमजस्याने तडजोड झाल्याने त्या पत्नीस तिच्या पतीने नांदावयास नेले आहे.

 अर्ज क्रमांक ३७/१९ या प्रकरणात दि. २७ नोवेंबर २०१९ रोजी अर्जदार यांनी त्यांच्या पत्नी पासून घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल केल होता. या प्रकरणातील पती-पत्नी  २०१८ पासून विभक्त रहात होते. आजच्या लोक अदालतीमध्ये या प्रकरणांतील पती-पत्नी यांच्यातील आपआपसातील मतभेद दूर करण्यात आले, त्यामुळे पतीने त्यांच्या पत्नीस नांदावयास नेले.

या लोकअदालतीमध्ये धनादेश प्रकरणी फिर्यादी पक्षाला एक कोटी९८ लाख ८२ हजार ३२४ रूपये वसूली करून देण्यात आली. भू-संपादन प्रकरणांमध्ये रुपये एक कोटी २४ लाख ९४ हजार ६२३ रूपये रक्कमेची तडजोड झाली आहे. दिवाणी स्वरुपाच्या प्रलंबीत प्रकरणांत एक कोटी ७६ लाख ४८ हजार ३४३ रूपये, वीज देयकाच्या वादपूर्व प्रकरणांमध्ये १६ हजार ८६० रूपये, बँकेच्या प्रलंबीत प्रकरणांमध्ये २ कोटी २३ लाख ७७ हजार ३७८ रूपये, बँकेच्या वादपूर्व प्रकरणांमध्ये २ कोटी ३४ लाख ८५ हजार २६५ रूपये, नगर पालिका आणि ग्रामपंचायतीची पाणीपट्टी तसेच घरपट्टीच्या प्रकरणांमध्ये २० लाख ४१ हजार ३६६ रूपये, ग्राहक आयोगाच्या प्रकरणांमध्ये ११ हजार ४५० रूपयांची तडजोड देण्यात आली. तर गुन्हा कबुलीच्या प्रकरणांमध्ये ४ लाख ०७ हजार १५५ रूपये ,दंड वसूल करण्यात आला आहे.

From around the web