उस्मानाबाद - सोलापूर रेल्वे मार्गासाठी यंदा २० कोटीची तरतूद 

अत्यल्प निधी मिळत असल्याने प्रत्यक्ष रेल्वे कधी धावणार ? 
 
उस्मानाबाद - सोलापूर रेल्वे मार्गासाठी यंदा २० कोटीची तरतूद

उस्मानाबाद - केंद्रीय अर्थसंकल्पात उस्मानाबाद - सोलापूर ( व्हाया तुळजापूर ) या ८४ किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गासाठी यंदा २० कोटी रुपयांची तरतूद  करण्यात आली आहे. जवळपास ९०० कोटीच्या या  रेल्वेमार्गासाठी गतवर्षी पाच कोटी आणि यंदा २० कोटी असा अत्यल्प निधी मिळत असेल तर प्रत्यक्षात रेल्वे रुळावर धावण्यासाठी किती कालावधी वाट पहायची हा चर्चेचा विषय ठरत आहे.


महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे वास्तव्य असलेले श्रीक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर येण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. उस्मानाबाद - सोलापूर ( व्हाया तुळजापूर ) रेल्वे मार्ग करावा म्हणून अनेक आंदोलने झाली, त्यानंतर या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी  गतवर्षी पाच कोटी आणि यंदा २० कोटी असा अत्यल्प निधी मिळाला आहे. 


निती आयोगाच्या यादीत आकांक्षीत जिल्हा म्हणून नोंद असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या अनुशंगाने सर्वच पातळीवर भरभरून बोलले जात आहे. परंतु, या जिल्ह्यातील मानवी उत्पन्नाचा निर्देश वाढविण्यासाठी आवश्यक ठोस उपाययोजनांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नुकत्याच केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पातून दिसत आहे.

रेल्वेचे जाळे ही एक महत्त्वाची बाब आहे. त्या अनुशंगाने दक्षिणोत्तर रेल्वेमार्ग व्हावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, यातील एक भाग असलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वेमार्गास २०१९ मध्ये मंजूरी देण्यात आली. त्यानंतरच्या सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात भुसंपादन व मोजणीकरीता ५ कोटीची तरतूदही करण्यात आली. परंतु, तब्बल दीड वर्षे लोटले तरी या मार्गावरील केवळ एका गावाची मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
 

From around the web