रब्बीची पेरणी करतांना शेतकऱ्यांनी  बीजप्रक्रीया करूनच पेरणी करावी

-पालकमंत्री शंकरराव गडाख
 
d

उस्मानाबाद - अतिवृष्टीमुळे खरीपाचे पीक हातातून गेले असले तरी रब्बी हंगामास वातावरण अनुकूल आहे. म्हणून शेतक-यांनी रब्बी हंगामाची चांगली तयारी करावी आणि बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

 वाशी तालुक्यातील पारा येथे महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या “प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह 18 ते 24 ऑक्टोबर” या कार्यकमाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.सावंत, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर,  वाशीचे तहसीलदार एन.बी. जाधव, कळंबचे तहसीलदार रोहन शिंदे, आदि उपस्थित होते.

रब्बी हंगामासाठी कृषी विभागामार्फत गुणात्मक आणि दर्जात्मक कृषी निवीष्ठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोणातून नियोजन करण्यात आले आहेत.यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून असल्याने बुर्शीची वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रीया करूनच पेरणी करावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री.गडाख यांनी यावेळी केले.

उस्मानाबाद जिल्ह्याचे रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 75 हजार 40 हेक्टर आहे.यामध्ये प्रामुख्याने हरभरा, ज्वारी आणि गहू या पीकांचा समावेश आहे. कृषी विभागामार्फत 18 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत रब्बी पिकांचे “प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह” जिल्ह्यामध्ये राबविला जात आहे.यावर्षी सर्वदूर चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बी हंगाम 2021 मध्ये 4 लाख 26 हजार 100 हेकटर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे.यामध्ये 2 लाख 6 हजार 500 हेकटरवर हरभरा हे पीक प्रस्तावित आहे. रब्बी हंगामामध्ये हरभरा पीकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण ही मोहीम राबवितांना एका        शेतक-यला पाच एकर मर्यादेपर्यंत प्रमाणित बियाणे मिळणार आहे.तसेच प्रती क्विंटल 2500 रुपये अनुदान दिला जाणार.यामध्ये महाडिबीटी अंतर्गत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रथम प्राध्यान्य दिले जाणारआहेत. उर्वरित लक्षांकांकरीता ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेऊन बियाणे वितरण केले जाणार.यासाठी 5795.77 क्विंटर एवढा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यामध्ये ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत 3900 क्विंटल हरभरा आणि 620 क्विंटल गहू बियाणे प्रती लाभार्थी 1 बॅग प्रमाणे निवड केलेल्या महसूल मंडळामधील गावांमध्ये वाटप केले जाणार आहे.तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत रब्बी ज्वारीसाठी 2476 क्विंटलचा मंजूर लक्षांक  ऑनलाईन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने आणि उर्वरित ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेऊन बियाणे वितरण सुरू आहे.


 

From around the web