राज्य सरकारची मदत जाहीर झाली , आता केंद्राच्या मदतीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी  दिल्लीत वजन वापरावे 

आमदार कैलास पाटील यांची अपेक्षा   
 
kelas patil

उस्मानाबाद - राज्य सरकारने निकषाच्या बाहेर जाऊन पारंपारीक मदतीच्या सिमा तोडुन शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर केली आहे. त्याबद्दल राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्यावतीने विशेष आभार . आता केंद्राकडुन मदतीची गरज असून यासाठी राज्याचे कर्तव्यदक्ष विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत आपले वजन वापरावे व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे.  

जिल्ह्यासह मराठवाड्यात पडलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभा राहिले आहे.त्यातुन सावरण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी अशी आग्रही मागणी सर्वांनीच केली होती.त्याला सरकारने सहानुभुतीपुर्वक विचार करुन मदतीची घोषणा बुधवारी केली.

राज्य सरकारने मदत द्यावी यासाठी श्री. फडणवीस यांनी ज्या प्रकारे पाठपुरावा केला अगदी त्याच तडफेने आता केंद्राकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.भाजपचे राज्याचे नेते म्हणुन आपल्याकडे पाहिले जाते, आपले पंतप्रधान व देशाच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांमध्ये चांगले वजन आम्ही पाहिले आहे. या वजनाचा जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी उपयोग व्हावा अशी भावना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला वाटते. 

तोक्ते वादळ आल्यानंतर ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातला तातडीने भेट दिली व दौरा संपण्याच्या अगोदर जशी गुजरात राज्याला हजारो कोटीची मदत जाहीर केली. श्री. मोदी यांच्यातील ही संवेदनशीलता पाहुन तुम्ही तशाच प्रकारची मदत मराठवाड्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना देऊन त्यांना आधार द्यावा असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

दुसर म्हणजे राज्याने पिकविमा हप्त्यापोटी रक्कम जमा केली असून  केंद्राने अद्याप हा हप्ता जमा केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवत मोदीसाहेबांना हप्ता भरण्याचीही तेवढी आठवण करुन द्यावी अशीही मागणी आमदार पाटील यानी केली. तुमच्या माध्यमातुन केंद्राची मदत मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळीसुध्दा गोड होईल असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

From around the web