विमा प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी धारेवर धरले 

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे पंचनामे करताना चुकीची माहिती भरल्यामुळे शेतकरी संतप्त 
 
s

तुळजापूर - काक्रंबा येथे पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करतेवेळी चुकीची माहिती भरत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी विमा प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे विमा कंपनीचे प्रतिनिधीना परत जावे लागले. 


प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित केले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी नुकसान झाले नंतर 72 तासाच्या आत संबंधित विमा कंपनीस आपल्या नुकसानीचा दावा दाखल करणे अनिवार्य आहे. 

sd

ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरणाऱ्या  शेतकऱ्यांचे पंचनामे सध्या सुरू आहेत पंचनामे करतेवेळी विमा कंपनीने दिलेल्या अप्लिकेशन मध्ये कर्मचारी विमा संरक्षित केलेल्या क्षेत्रापेक्षा 50 टक्के क्षेत्र बाधित दाखवणे नुकसानीची टक्केवारी कमी दाखवणे, कोऱ्या पंचनाम्यावर सह्या घेणे, शेतकर्‍यांकडून पैशाची मागणी असे प्रकार घडत आहेत. 

या गोष्टी काही सुशिक्षित शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी आज दिनांक 27 रोजी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना ग्रामपंचायत कार्यालय येथे चांगलेच धारेवर धरले.जो पर्यंत चुकलेले पंचनामे दुरुस्त करणार नाहीत व व्यवस्थित पंचनामे करणार नाहीत तो पर्यंत पंचनामे होऊ देणार नाही असे शेतकऱ्यांनी संगितल्यानंतर  विमा कंपनीचे प्रतिनिधी परत गेले

From around the web