स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविंद्र इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल

पोलिसांविषयी अश्लील शब्द वापरले म्हणून गुन्हा दाखल  
 
s

लोहारा : पोलिसांविषयी अपशब्द वापरले म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्यावर लोहारा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सभा, मोर्चे, आंदोलने या संदर्भात  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन रविंद्र इंगळे यांनी दि. 12.11.2021 रोजी 19.20 ते 21.00 वा. दरम्यान माकणी गावात करजगाव रस्त्यावर अंदाजे 600 लोकांची सभा आयोजित केली. 

यावेळी लोहारा पोलीसांनी उपरोक्त मनाई आदेश त्यांस अवगत करुन दिला असता इंगळे यांनी तो आदेश न जुमानता सभा चालू ठेवली. तसेच जनमाणसातील पोलीसांची प्रतिमा डागाळण्याच्या हेतूने सभेदरम्यान इंगळे यांनी पोलीसांबद्दल अश्लील शब्द वापरले.

यावरुन लोहारा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- सदाशिव पांचाळ यांनी दि. 16.11.2021 रोजी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 294 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 102/117 तसेच  पोलीस अप्रीतीची भावना चेतवने कायदा -कलम 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

परंडा : शिराळा येथील सीना नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन महसुल विभागाचे पथक दि. 14.11.2021 रोजी 19.00 वा. सु. नमूद ठिकाणी गस्तीस होते. यावेळी शिराळा ग्रामस्थ- नितीन अशोक कांबळे हे एका ट्रॅक्टर- ट्रेलरमधून अवैधरित्या वाळु (गौण खनिज) नदी पात्रातून चोरून वाहुन नेत असतांना आढळले. यावर पथकाने कांबळे यांना ट्रॅक्टर- ट्रेलरसह तहसिल कार्यालय, परंडा येथे कारवाई कामी पथकासोबत चलण्यास सांगीतले असता कांबळे यांनी पथकास अरेरावीची भाषा करुन ट्रॅक्टर पथकाच्या अंगावर घालण्याची धमकी देउन तेथून वाळुसह ट्रॅक्टर- ट्रेलर घेउन पसार झाला. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन तलाठी- तुकाराम वाळके यांनी दि. 16.11.2021 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 379, 504 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम- 9, 15 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web