नुकसान भरपाई मिळण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करावी 

शेतकऱ्यांनी कोऱ्या फॉर्मवर सह्या करू नये 
 
sxz
- खा. राजेनिंबाळकर व आ. पाटील यांचे आवाहन

उस्मानाबाद -  जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ४२ मंडळ पैकी ३० मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांची शेतकरी बांधवानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन खा.‌ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना केले आहे. 

 जिल्ह्यात १ लाखाच्यावर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या ऑनलाईन तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांचे पंचनामेही सुरू झाले आहे. परंतू माझ्या असे निदर्शनास आले आहे की, पंचनामे करणारे अधिकारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईच्या फॉर्मवर फक्त शेतकऱ्यांचे नाव टाकून कोऱ्या फॉर्मवर कोणतीही नुकसान भरपाईची आकडेवरी न टाकता शेतकऱ्यांच्या सह्या घेत आहेत. आपण कोऱ्या फॉर्मवर सही केल्यास आपल्या सहीचा फॉर्मवर विमा कंपनीचे अधिकारी आपले झालेले नुकसान कमी दाखवून आपल्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित ठेवू शकतात.

त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पीक नुकसानीचा फॉर्मवर शेतकऱ्यांचे नाव, गट नं, क्षेत्र, नुकसानीची टक्केवारी पूर्ण योग्यरीत्या संपूर्ण फॉर्म भरलेली पडताळणी केल्याशिवाय सही करू नये. विशेष म्हणजे संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरावी व ७० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दाखवून आपली सही व ५ साक्षीदारांच्या सह्या कराव्यात. तसेच आपण केलेल्या नोंदणी व योग्य ती कार्यवाही होऊन आपल्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर आणि केंद्रस्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत. बाबत जर काही तक्रार असतील तर माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन खा. राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी कोऱ्या फॉर्मवर सह्या करू नये 

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे विमा कंपनी मार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन तक्रार दाखल करताना शेतकरी बांधवांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पिकविमा प्रतिनिधी यांच्याकडे ऑफलाईन तक्रार दाखल करत आहेत. पंचनामे करणारे विमा कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी नुकसान भरपाईच्या फॉर्मवर फक्त शेतकऱ्याचे नाव टाकून कोऱ्या फॉर्मवर कोणतीही नुकसान भरपाईची आकडेवरी न टाकता शेतकऱ्यांच्या सह्या घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. आपण कोरे फॉर्मवर सही केल्यास आपल्या सहीचा फॉर्मवर विमा कंपनीचे अधिकारी आपले झालेले नुकसान कमी दाखवून आपल्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित ठेवू शकतात. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी पिक विमा योजनेच्या फॉर्म वर आपली पूर्णपणे नुकसान भरपाईची टक्केवारी आणि योग्य रित्या संपूर्ण फॉर्म भरलेली पडताळणी केल्याशिवाय सही करू नये असे आवाहन आ कैलास पाटील यांनी केले.

From around the web