विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जिल्हयात आठ ऑक्टोंबर पर्यंत पावसाचा अंदाज

सावधगिरी बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
 
s

उस्मानाबाद - मुंबईतील कुलाबा येथील हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागासह  मराठवाडा आणि उस्मानाबाद जिल्हयात  दि.4 ते 8 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यामुळे जिल्हयातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी (सावधगीरी) बाळगावी,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

मराठवाडयातील उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्हयात 4 ऑक्टोंबर रोजी वादळीवाऱ्यासह,विजेच्याच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.यात पाऊस मात्र तुरळक ठिकाणी होणार असल्याचा अंदाज आहे.5 ऑक्टोंबर 2021 रोजी औरंगाबाद आणि जालना जिल्हयात तर 6 ऑक्टोंबर 2021 रोजी उस्मानाबाद,लातूर,नांदेड,जालना,परभणी आणि औरंगाबाद जिल्हयात वादळी वारे वाहून विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडण्याचाही अंदाज आहे.

येत्या 7 ऑक्टोंबर 2021 रोजी उस्मानाबाद,लातूर,औरंगाबाद,बीड,जालन जिल्हयात वादळी वारे,विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर 8 ऑक्टोंबर 2021 रोजीही उस्मानाबाद,लातूर,बीड आणि औरंगाबाद जिल्हयात वादळीवाऱ्यासह,विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सावधगीरी बाळगावी,असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी केली आहे.

अरबी समुद्रात केरळच्या किनारऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.या वाऱ्यामुळे उद्या मंगळवार (दि.5) पर्यंत पश्चिम किनाऱ्याजवळच कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.त्यामुळे  जिल्हयात येत्या 8 ऑक्टोंबर पर्यंतही परिस्थित राहण्याची शक्यता आहे.

From around the web