प्रधानमंत्री पीक विमा योजनेत द्राक्ष,मोसंबी, डाळींब,केळी,आंबा आणि पपई फळबागांचा समावेश 

विमा हप्ता रक्कम भरुन पीक संरक्षित करण्याचे आवाहन 
 
sd

 उस्मानाबाद - प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना“अंबे बहार 2021” पुढील तीन वर्षासाठी राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

उस्मानाबाद जिल्हयासाठी अंबे बहारात द्राक्ष,मोसंबी, डाळींब,केंळी,आंबा आणि पपई या फळबागांचा समावेशआहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. 

     जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र  देणार नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजने अंतर्गत अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. योजनेत सहभाग घेणेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जसोबत आधार कार्ड, 7/12 उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांश सह फोटो व बँक पासबुकची प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

खालीलप्रमाणे विमा हप्ता रक्कम भरुन पीक संरक्षित करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरीता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित आणि अतिरिक्त विमा हप्ता हा बँकेमार्फतच भरणे आवश्यक आहे. 

     जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
                   

From around the web