नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याच्या कामाला स्थगिती

नळदुर्ग - जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आंतिम निकाल येत नाही तोपर्यंत ठेकेदारांनी नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याचे काम अनाधिकृत करू नये, असा निर्णय शेतकरी आणि ठेकेदाराच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.त्यामुळे शहापूर येथील साठवण तलाव मध्ये करण्यात येणारे "जल"आंदोलन स्थगित करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याचे काम .मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचे आवमान करून संबंधित ठेकेदार व जबाबदार राष्ट्रीय महामार्ग आधिकारी यांच्या मार्फत रस्त्याचे अनाधिकृत काम केले जात आहे. याविरोधात शेतकरी संघर्ष समिती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 शेतकऱ्यांच्यावतीने दिनांक ९ डिसेंबर रोजी शहापूर ता.तुळजापूर येथील साठवण तलाव मध्ये"जल"आंदोलन करण्यात येणार होते,
परंतु नळदुर्ग पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊतयांच्या मध्यस्थीने नळदुर्ग पोलिस ठाण्यात संबंधित अधिकारी, ठेकेदार व शेतकरी संघर्ष समिती पदाधिकारी याची बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढु असे आश्वासन दिल्याने नळदुर्ग पोलिस ठाण्यात.डॉ. योगेश खरमाटे ( सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उस्मानाबाद ) सौदागर .तांदळे ( तहसीलदार तुळजापूर) संतोष कुलकर्णी ( कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर ) संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी, स्वभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजी सोमवशे यांच्यासह शेतकरी संघर्ष समिती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग अक्कलकोट पदाधिकारी नळदुर्ग ,वागदरी,गुजनुर, शहापूर, गुळहाळ्ळी,निलेगाव गावातील शेतकरी बौठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी .डॉ. योगेश खरमाटे, उप विभागीय अधिकारी व संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता यांनी संबंधित ठेकेदारांनी .मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आंतिम निकाल लवकरच लागणार आसुन ठेकेदारांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आवमान होईल आसे काम करू नये, व शेतकऱ्यांनी संयम बाळगावा असे आवाहन बैठकीत केले.
जोपर्यंत.उच्च न्यायालयाचा आंतिम निकाल येत नाही तोपर्यंत ठेकेदारांनी रस्त्याचे काम अनाधिकृत करू नये असे आदेश संतोष कुलकर्णी,कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग सोलापूर यांनी आदेश दिल्याने शेतकऱ्यांचे समाधान झाल्यानंतर शेवटी सपोनि जगदीश राऊत यांनी आभार मानले.