उस्मानाबाद : शेतक-यांची फसवणूक करणा-या राज्य सरकारचा काळ्या फिती लावून निषेध

 मविआ सरकार फक्त पोपटपंची करतंय  - आ. राणा जगजितसिंह पाटील 
 
s

उस्मानाबाद  -  शेतक-यांची फसवणूक करणा-या राज्य सरकारचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद  तालुक्यातील बावी येथे स्थानिक शेतकऱ्यांसोबत काळ्या फिती लावून राज्य सरकारच्या विरोधात निषेध  व्यक्त करण्यात आला.


यावेळी  नितीन काळे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे  शेतकरी अगोरदच मोठ्या आर्थीक संकटात सापडलेला आहे. शेतक-याना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने हेक्टरी १० हजार रुपये अनुदान जाहीर  केले. शेतक-यांना एक प्रकारची आशा होती. दिवाळी अगोदर अनुदान रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा होईल परंतु तसे न होता आज पासून दिवाळीला सुरुवात झाली परंतु सरकारचे अनुदान अद्यापही शेतक-यांना मिळाले नाही. 

d

 आ. राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की, सरकारने हेक्टरी रु. १० हजार अनुदान जाहीर केले आहे  परंतु त्यातही नुकसानग्रस्त भागात टक्केवारीनुसार मदत जाहीर केली ,त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयातील शेतक-यांना ६६ टक्के इतकेच  अनुदान देण्याचे ठरले आणि त्यातही ‍ पहिल्या टप्प्यात ७५ टक्के  एवढीच रक्कम शेतकरी बांधवाना त्यांच्या खात्यावर मिळणार आहे. त्यामुळे हे मदत करणारे सरकार नसून फसवणूक करणारे सरकार आहे, त्यामुळे या सरकारचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही व शेतकरी बांधव काळ्या फिती लावून  जाहीर निषेध व्यक्त करत आहोत ,आज पासून दिवाळीला सुरुवात झाली , परंतु मदत अद्यापही जमा झालेली नाही. नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त असताना मदतीऐवजी मविआ सरकार पोपटपंची करतंय. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. राज्य सरकारने संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांचा फार काळ अंत न पाहता त्यांना तात्काळ अनुदान खात्यावर जमा करून मदत करावी . अन्यथा शेतकऱ्यांच्या फार मोठया असंतोषास सामोरे जावे लागेल .

d

या निषेध प्रसंगी भाजपचे जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, तसेच बावी येथील शेतकरी बांधव व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

   

From around the web