गोठा जळणाऱ्या आरोपींना मुरुम पोलिसांचे अभय

मुरूम - उमरगा तालुक्यातील कोथळी येथील एका शेतकऱ्याचा गोठा जाळून तीन जनावरांच्या मृत्यूला आणि सहा लाखाचे नुकसान करणाऱ्या दोन संशयित आरोपींना मुरूम पोलिसांनी पाठीशी घातल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कोथळी येथील शेतकरी कल्याणी श्रीरंग शेवाळे यांच्या शेतातील गोठ्यास १५ मे रोजी रात्री साडेसात - आठ वाजता गावातील दोन समाजकंटकानी सूडबुद्धीने आग लावल्याने गोठा पूर्णपणे जळून खाक झाला आणि त्यात एक बैल, एक गाय आणि गायीचे वासरू तडफडून मरण पावले तसेच अन्नधान्य, शेतीचे अवजारे, जनावराचा कडबा असे सहा ते सात लाखाचे नुकसान झाले.
याप्रकरणी स्थानिक तलाठ्याने पंचनामा केला, त्यानंतर मुरूम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली, गोठा जळणाऱ्या दोन संशयित व्यक्तीची नावे देखील त्यात देण्यात आली पण दीड महिना झाला तरी पोलिसांनी आग लावणाऱ्याविरुद्व कोणतीही कारवाई केली नाही.
गोठा जाळणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी तसेच शासनातर्फे नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा अज्ञात ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी कल्याणी श्रीरंग शेवाळे यांनी दिला आहे.