पुणे, मुंबई येथील विमा कंपनी कार्यालयास टाळे ठोकणार

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दुधगावकर यांचा इशारा, विम्यासाठी ५ डिसेंबरची मुदत
 
dhudhgavkar

उस्मानाबाद : शेतकर्‍यांना त्वरीत आणि सरसकट ५ डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर २० हजार रुपये विमा मिळावा, अन्यथा पुणे व मुंबई येथील बजाज अलायन्स इन्शोरन्स विमा कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीकडून करण्यात आले. परंतू आजपर्यंत बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीने शेतकर्‍यांना विमा मंजूर केलेला नाही. तसेच मागील वर्षाच्या विम्याची उर्वरित राहिलेली रक्कम अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना दिलेली नाही.त्यासोबतच यावर्षी शेतकर्‍यांकडून विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पैशाची मागणी केली आहे. 

त्यामुळे सदर प्रतिनिधी विरुद्ध फौजदारी खटले दाखल करून बजाज इन्शुरन्स विमा कंपनीला काळ्या यादीत टाकावे. तसेच शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी केली निवेदनात केली असून येत्या५ डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुणे व मुंबई येथील बजाज अलायन्स इन्शोरन्स विमा कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

From around the web