१० एकर शेतीतून वर्षाकाठी २५ लाख रुपयांची कमाई

मसला खुर्द गावातील सुशिक्षित अँड सोमेश वैद्य यांची यशोगाथा 
 
s

 तुळजापूर -  कोरोना काळात अनेक उद्योगधंदे, कामं ठप्प झाली. प्रत्येकजण घरात राहूनच मिळेल ते काम करु लागला. तुळजापूरातील मसला खुर्द गावातील सुशिक्षित शेतकरी अँड सोमेश वैद्य व कुटुंबाने कोरोना लॉकडाऊनचा सदुपयोग केला. १० एकर शेतीतून त्यांनी वर्षाकाठी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे.

 सोमेश वैद्य हे गेल्या १५ वर्षापासून मंत्रालयात स्वीय सहायक पदावर कार्यरत असून ते सध्या  भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे मुंबईतील काम पाहतात. पेरू बाग शिवाय सोमेश यांनी त्यांच्या उर्वरित शेतात कोकणातील  जातिवंत  केशर आंबा दोन हजार झाडे आणि सिताफळ बाग लागवड केली असून त्याचे उत्पादन येत्या २ वर्षात मिळेल असंही त्यांनी सांगितले आहे. मात्र लॉकडाऊनचा सदुपयोग करत सोमेशने केलेल्या कामगिरीमुळे ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत

१० हजार पेरू झाडाचे उत्तम संगोपन 

s

दरम्यान, अँड सोमेश वैद्य यांनी गेल्या जून २०२० मधे तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द या गावात ५ एकर आणि  उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डि गावात ५ एकर थाई ७ आणि पिंक सुपर वाण जातीचा  पेरू बाग व्यक्तिश  स्वतः लक्ष  घालून लागवड  केली होती. गेल्या १८ महिन्यात त्यानी पेरू बाग अत्यंत चांगली जोपासली असून ड्रिप सिंचन द्वारे खते व पाणी झाडास उपलब्ध करून अत्यंत योग्य नियोजन द्वारे १० हजार पेरू झाडाचे उत्तम संगोपन केले आहे.

शेताला कायम स्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यानी आधुनिक पध्तीने १ एकर मधे शेततळे बांधले असून २ विहिरीद्वारे मुबलक पाणी साठा केला आहे. अत्यंत नियोजनबद्ध केलेल्या शेतीतून त्यांना मेहनतीचं फळ मिळालं. गेल्या तीन महिन्यापासून पेरू उत्पादन सुरू असून आतापर्यंत त्यानी १०० टन पेरू सोलापूर, उस्मानाबाद, लातुर  बेळगाव,अहमदनगर येथील व्यापारी आणि बाजार समितीमध्ये विकून २५ लाख रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. तसेच सोमेश यांनी केवळ स्वत: शेती उद्योग न करता परिसरातील गरजू व्यक्ती आणि महिलांना नियमित रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सोमेशचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आतापर्यंत १०० टन पेरूची विक्री

शेताला कायम स्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यानी आधुनिक पध्तीने १ एकर मधे शेततळे बांधले असून २ विहीरद्वारे मुबलक पाणी साठा केला आहे. वैद्य यांनी अत्यंत नियोजनबद्द शेती विकसित केली असून, तीन महिन्यापासून पेरू उत्पादन सुरू आहे. आतापर्यंत त्यानी १०० टन पेरू सोलापूर उस्मनाबाद  लातूर  बेळगाव, अहमदनगर येथील व्यापारी आणि बाजार समिति मधे विकून २५ लाख रुपयाचे उत्पादन मिळवले आहे. तसेच परिसरातील गरजू व्यक्ती आणि महिलांना नियमित रोजगार उपलब्ध करून दिला आहे. याबाबत श्री वैद्य यांचे परिसरातील शेतकरी कडून कौतुक केले जात आहे. 
.

From around the web