उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ८८ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा

ठाकरे सरकारची घोषणा आणि प्रत्यक्ष मदत यात तफावत असल्याने संभ्रम 
 
s

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अखेर काल ( सोमवार ) पासून अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ठाकरे सरकराने केलेली घोषणा आणि प्रत्यक्ष अनुदान यात तापवत दिसून येत आहे. एकाच मंडळातील शेतकऱ्यांना कमी अधिक प्रमाणात अनुदान जमा झाल्याने संभ्रम  निर्माण  झाला आहे. 


ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घालून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते.यंदा मोठ्या प्रमाणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उभी पिकं पाण्यात गेल्याने पिकांचे नुकसान झाले होते. ठाकरे सरकारने जिरायतीसाठी हेक्टरी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत जाहीर केली होती. यानुसार शासनाने पहिल्या टप्प्यात ७५ टक्के रक्कम प्रशासनाला अदा केली आहे. त्यानुसार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. मात्र, यापेक्षा अत्यंत कमी रक्कम हेक्टरी शेतकऱ्यांना मिळाली आहे.

हेक्टरी १० हजार रुपये अनुदान गृहीत धरले आणि ७५ टक्के रक्कम गृहीत धरली तर शेतकऱ्यांचा खात्यावर प्रति हेक्टरी ७५०० रुपये जमा होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ३३७५ ते ५२२५ रुपये जमा  होत आहेत. एकाच मंडळातील दोन शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्राप्त झालेल्या अनुदानात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारची घोषणा फसवी असल्याचा आरोप भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे.  दरम्यान, नुकसानीच्या टक्केवारीनुसारच रक्कम जमा झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

d


जिल्ह्यात सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी होऊन काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात अाले तसेच राज्य शासनाने मदतीचे आश्वासनही दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा केली होती. तसेच ही रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर मात्र यापैकी ७५ टक्के रक्कम दिवाळीपूर्वी व उर्वरित रक्कम दिवाळीनंतर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्याला २३७ कोटी ६१ लाख, ७२ हजार रुपये प्राप्त झाले होते. सोमवारी एकाच दिवसात २१० कोटी ५५ लाख, ५४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनुदान जमा करण्याचे हे प्रमाण ८८.६१ टक्के इतके आहे. विशेष म्हणजे वाशी तालुक्याचे सर्वाधिक १०० टक्के अनुदान जमा केले असून, कळंब तालुक्यात ९९.२३ टक्के, उमरगा तालुक्यात ९०.२७ टक्के, लोहारा ९०.२२, उस्मानाबाद ८९.२६, तुळजापूर ८३.९१,भूम ८०.५५ व परंडा तालुक्यात ७२.६८ टक्के मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.


 

From around the web