पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं 

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा उस्मानाबादेत टोला 
 
s

उस्मानाबाद : राज्य सरकार केंद्र सरकारच्या मंत्राला अटक करते, तर केंद्र सरकारने राज्यातील एका मोठ्या वजनदार नेत्यांच्या नातेवाइकांच्या घरावर धाडी टाकत टोळी युद्ध सुरू केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे जनतेचा प्रश्न निर्माण झाला की खोटे- खोटे भांडण करुन जनतेची दिशाभूल करत आहेत. राजकीय बदला घेण्यासाठी या इडी, सीबीआय अशा संस्थांचा वापर केला जात आहे. हे सगळं जनता उघड्या डोळ्यांनी बघत असल्याचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील  वाघोली येथे एफ.आर.पी.चा जागर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी  ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.   यावेळी माध्यमाशी ते बोलत होते.

पूरग्रस्त  शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत असे हे सरकार सांगत आहे. यामुळे पैसे नसतील, तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं असा सल्लाही  राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूर येऊन अडीच महिने लोटले आहेत.मात्र, अद्यापही त्यांना मदत मिळाली नाही. ते लोक मदतीसाठी टाहो फोडात आहेत. मुख्यमंत्री फक्त आधार देण्याचे काम करत असून शाब्दिक खेळ केले जात आहेत,असेही राजू शेट्टी म्हणाले. 

From around the web