पालकमंत्री शंकरराव गडाख बुधवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

 
gdakh

उस्मानाबाद -  पालकमंत्री तथा राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे उद्या दि .29 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत .ते अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाची , नुकसानीची पाहणी करणार आहेत . 

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे सकाळी ११.०० वाजता उस्मानाबाद तालुक्यातील  दाऊतपूर  येथे आगमन झाल्यानंतर  पूरग्रस्त भागाची पाहणी करतील . त्यानंतर  सकाळी ११.२० वाजता  इर्ला त्यांचे  येथे आगमन होईल , तेथे ते  नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करतील . सकाळी  ११.४० वाजता ईर्ला येथून तेर ( ता. जि. उस्मानाबाद ) कडे प्रयाण करतील .     

दुपारी  १२.०० वाजता तेर येथे आगमन झाल्यानंतर  अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची पाहणी करतील . तेर येथील  ग्रामीण रुग्णालय  येथे भेट देतील त्यानंतर  नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करतील . दुपारी १२.२५ वाजता तेर येथून वाकडी (इस्थळ), (ता. कळंब ) कडे प्रयाण करतील . 

दुपारी १.२५ वाजता वाकडी (इस्थळ) (  ता. कळंब ) येथे आगमन आणि  पुरग्रस्त भागाची पाहणी करतील .दुपारी१.४० वाजता वाकडी (इस्थळ) येथून सौंदना (आंबा), ( ता. कळंब ) कडे प्रयाण करतील . दुपारी १.४५ वाजता सौंदना (आंबा) येथे आगमन आणि  पुरग्रस्त भागाची पाहणी करतील . सोईनुसार सौंदना (आंबा) येथून अहमदनगरकडे प्रयाण करतील .

From around the web