बजाज अलायन्स कंपनीसह प्रतिनिधींवर फौजदारी गुन्हे दाखल करा

राष्ट्रवादीचे दुधगावकर यांची पालकमंत्री गडाख यांच्याकडे मागणी
 
s

उस्मानाबाद : बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनी व त्यांचे प्रतिनिधींनी शेतकर्‍यांना पंचनाम्यासाठी पैशाची मागणी करणे, शेतकर्‍यांना धमकावने असे प्रकार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पालकमंत्रभ शंकरराव गडाख यांना दिलेल्या निवेदनात गुरुवारी (दि.21) दिला आहे.

पालकमंत्री शंकरराव गडाख हे जिल्ह्यात नुकसान पाहणी दौर्‍यासाठी आले होते. यावेळी संजय पाटील दुधगावकर यांनी त्यांची भेट घेवून निवेदन दिले. या निवेदनात दुधगावर यांनी म्हंटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनी व त्यांचे प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकर्‍यांकडून पंचनाम्यासाठी पैशाची मागणी करत आहेत.

 तसेच शेतकर्‍यांना कागदपत्रांची मागणी करुन त्यांना त्रास व धमकावण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनी व त्यांचे प्रतिनिधी यांच्या विषयी शेतकर्‍यांमध्ये असंतोष असून त्याचा उद्रेक होईल, त्यामुळे हा प्रकार थांबवून बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनी व त्यांचे संबधित प्रतिनिधी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा बजाज अलायन्स कंपनीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. दुधगावकर यांनी निवेदनात दिला आहे.
 

From around the web