पंचनामे करताना कोण हयगय करत असल्यास शेतकऱ्यांनी थेट संपर्क करावा Video 

- आमदार कैलास पाटलांचे शेतकऱ्यांना अवाहन 
 
s

उस्मानाबाद - कळंब तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात गेले आहे. या अतिवृष्टीग्रस्त भागाची शिवसेना आमदार  कैलास घाडगे यांनी पाहणी केली. पंचनामे करताना कोण हयगय करत असल्यास शेतकऱ्यांनी थेट आपणास  संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले. 


आ. पाटील यांनी शनिवारी बहुला, आढाळा,आथर्डी,सात्रा,खोंदला, भाटसांगवी ,भोगजी,अडसुळवाडी,देवळाली या  अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाकरे सरकार आहे, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सोयाबीन व इतर पिकांच्या नुकसानीच्या पिक विमा कंपनीस ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यानी सांगितले.मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्याचेही त्यानी म्हटले आहे.

d

पीक विमा कंपनीच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरिता वैयक्तिक पंचनामे होणे आवश्यक आहे.यासाठी शेतकऱ्यांनी पिकांचा विमा भरला असल्यास बजाज एलियांज जी आईसी लिमिटेडचे नवीन "फार्ममित्र-केयरिंगली योर्स"अँड्रॉइड अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे नुकसान झालेल्या पिकांची माहिती 72 तासांच्या आत कळविण्याचे अवाहनही आमदार पाटील यांनी केली. 

व्यतिरिक्त पिक विमा बाबतीत काही अडचण आल्यास संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक, विमा कंपनीच्या तालुकास्तरावरील विमा प्रतिनिधी किंवा तालुका व्यवस्थापक (मॅनेजर) यांच्याशी संपर्क साधून नुकसानीच्या तक्रारी ऑफलाईन दाखल करून पोहोच घ्याव्यात. या प्रक्रियेत कोण हयगय करत असेल किंवा दुर्लक्ष करीत असल्यास त्याबाबत तातडीने आपल्याशी संपर्क साधा असेही आवाहन आमदार घाडगे पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले आहे.

Video 

From around the web