उस्मानाबाद जिल्हयात अतिवृष्टी : खा. ओमराजे यांचे केंद्राकडे बोट 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने N.D.R.F. मधून भरीव निधी मंजूर करावी
 
d

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यातील  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने N.D.R.F. मधून भरीव निधी मंजूर करावी, अशी मागणी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

उस्मानाबाद, कळंब, वाशी, भूम, परंडा, तुळजापूर, उमरगा, लोहारा, औसा व निलंगा तसेच  बार्शी हे सर्व क्षेत्रामध्ये सर्वात मोठया प्रमाणात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्यामुळे बहुतेक भाग जलमय झाला आहे. 

 दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी "गुलाब" चक्रीवादळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात २४ तासात १८० मि.मी. मुसळधार पाऊसाची नोंद झाली आहे. या परिस्थितीची चाचणी घेण्यासाठी तातडीच्या स्वरूपात केंद्रीय पथक पाठविण्याची आवश्यकता आहे.

 या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील खरिप पिकांचे (सोयाबीन, उडीद, मूग, तूर), गावांत पाणी शिरल्याने घरांची पडझड तसेच जनावरे वाहून जाणे असे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी तात्काळ NDRF अंतर्गत निधी देण्यात यावी. व पिक विमा, महसूल, कृषी विभागाने पिकांचे पंचनामे स्वीकारल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पिक विमा मंजूर करून तात्काळ रक्कम देण्यासंदर्भात शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषिमंत्री नरेंद्रजी तोमर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

From around the web