धाराशिव : महात्मा फुले शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांची चौथी यादी प्रसिद्ध 

 
s

धाराशिव -  जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते की,महाराट्र शासनाने,शासन निर्णय दि.29 जुलै 2022 अन्वये माहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीककर्जची नियमितपणे परतॅफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु.50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे.

          जिल्हयातील 153 गावांतील 602 लाभार्थी शेतकऱ्यांची चौथी यादी दि.29 मार्च 2023 रोजी योजनेच्या पोट्रलवर प्रसिध्द करण्यात आली आहे.या याद्या गांवांतील महा-ईसेवाकेंद्र/सी.एस.सी.सेंटरवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ मिळणेकरीता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.आजअखेर 4248 शेतकरी लाभार्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही.

          तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी महा-ईसेवाकेंद्र/सी.एस.सी.सेंटर किंवा बँक शाखेत जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी  डॉ.सचिन ओम्बासे आणि जिल्हा उपनिबंधक एस.यु.शिरापूरकर  यांनी केले आहे.

From around the web