उस्मानाबाद जिल्ह्यात पिकांचे पंचनामे ई-पीक पाहणी ऐवजी प्रत्यक्ष पाहणी करून करण्याची मागणी  

 
s

उस्मानाबाद - जिल्ह्यात गत काही दिवसापासुन मोठ्या प्रमाणात पाऊस होत असुन शेतामध्ये उभ्या असलेल्या पीकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ब-याच गावात पाणी शिरल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद, मुग, तुर, फळबागा, ऊस, सोयाबिन, टोमॅटो अशा शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या ई-पीक पाहणी करने हे तांत्रिक दृष्टया शक्य होत नसून मोबाईल नेटवर्क व ईतर कारणाने हे जाचक होत आहे.तरी झालेली नुकसान पाहणी प्रत्यक्षरित्या करुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन शेतक-यांना सरसकट भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. 

खरीप हंगामातील पीककर्ज 100 टक्के वाटप करण्याची मागणी 

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासुन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत असल्याने शेतक-यांना पेरणीच्या वेळी पीककर्ज मिळत नाही. सध्या केंद्र शासनाच्या व राज्यशासनाच्या निर्देशानुसार रब्बी व खरीप हंगामात शेतक-यांना सरसकट पीककर्ज देण्यात यावे असे सुचवले आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँकामार्फत गत वर्षांपासुनची अनेक प्रकरणे प्रलंबित असुन शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना पीककर्ज वाटपास विलंब करत आहेत. पेरणी हंगाम संपत आला असुन तयार असलेली अनेक प्रकरणे पाटप केलेली नाहीत. राष्ट्रीयकृत बँकाकडुन 31 ऑगष्ट पर्यंत पीककर्ज वाटपाची आकडेवारी खालील प्रमाणे -

1. बँक ऑफ बडोदा –  41 %   10. युनियन बँक ऑफ इंडीया –  67%
2. बँक ऑफ इंडीया – 58% 11. ॲक्सीस बँक –  41%
3. बँक ऑफ महाराष्ट्र – 46% 12. एच.डी.एफ.सी. बँक – 28%
4. कॅनरा बँक – 31% 13. आय.सी.आय.सी.आय. बँक –  33%
5. सेंट्रल बँक ऑफ इंडीया   – 69% 14. आय.डी.बी.आय. बँक –  57%
6. इंडीयन बँक (अलाहबाद) –  46% 15. रत्नाकर बँक –  23%
7. पंजाब नॅशनल बँक – 43% 16. महाराष्ट्र ग्रामीण बँक – 70%
8. भारतीय स्टेट बँक – 40% 17. डी.सी.सी. –  57%
9. युनो बँक – 37%

यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी एकुण सरासरी 44 % पीककर्ज वाटप केले आहे. खाजगी राष्ट्रीयकृत बँकांनी सरासरी 39 % तर ग्रामीण बँकांनी 70 % तसेच सहकारी बँकांनी सरासरी 57 % पीककर्ज वाटप केले असुन संपुर्ण आकडेवारी पाहता सरासरी 51 % पीककर्ज वाटप केले आहे.ज्या बँकांनी 100% पीककर्ज वाटप केले नाही अशा संबंधित बँक अधिका-यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. 

From around the web