पीक विमा : उस्मानाबाद जिल्ह्याला ८०० कोटी हवे होते, मिळाले ४०७ कोटी !

केंद्र सरकारचे ते नोटिफिकेशनच जबाबदार  - ओमराजे 
 
s

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जम होत आहे. यावरून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला 800 कोटी हवे होते, पण  407 कोटींचाच विमा मिळाला आहे. याला केंद्र सरकारचे ते नोटिफिकेशनच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात सुरुवातीला पावसाचा खंड व नंतर अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. सर्वच मंडळात सरासरी 72 ते 88 नुकसान झाले आहे. याबदल्यात विमा कंपनीकडून प्रति हेक्टरी 27 ते 33 हजार रुपये प्रति हेक्टरी भरपाई शेतकरी बांधवांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कंपनी सध्या हेक्टरी 13 ते 17 हजार रुपयेच भरपाई अदा करीत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या भरपाईच्या तुलनेत अर्धीच भरपाई मिळत आहे. याला केवळ आणि केवळ केंद्र शासनाने 17 ऑगस्ट 2020 रोजीच्या नोटिफिकेशनमधील पेज क्रमांक 76 वरील मुद्दा जबाबदार आहे. 

पूर्वी भरपाई निश्चित करण्यासाठी काढणीपूर्व झालेल्या नुकसानीचे प्रमाण ग्राह्य धरण्यात येत होते. मात्र, आता काढणीपूर्व नुकसान सोबतच काढणी पश्चात पीक कंपनी प्रयोगातून येणारे नुकसानही ग्राह्य धरून दोन्हीची सरासरी धरली जात आहे. यामुळे नुकसानीचे प्रमाण कमी येत असल्याचे स्पष्ट होत आहे. नेमका हाच मुद्दा कंपनीने लावून धरत शेतकरी बांधवांना अपेक्षित भरपाईच्या अर्धीच रक्कम मिळत आहे. ही बाब दुर्दैवी आहे. तरीही शेतकरी बांधवांचा पूर्ण भरपाई मिळवून देण्यासाठी आपण कंपनीविरोधात लोकसभेत व न्यायालयीन लढा देऊन शेतकरी बांधवांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहूअसेही खासदार ओमराजे यांनी म्हटले आहे. 

s

From around the web