शेतकऱ्यांना सोमवारपासून बँक खात्यात जमा होणार अतिवृष्टीची भरपाई

उस्मानाबाद जिल्ह्यातील चार लाख ५५ हजार ४०६ शेतकऱ्यांना मिळणार २३७ कोटी
 
s

उस्मानाबाद - अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड होणार आहे.  शेतकऱ्यांना सोमवारपासून बँक खात्यात अतिवृष्टीची भरपाई जमा होणार आहे. दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी १० हजार रूपये मदतीची घोषणा ठाकरे सरकारने केली होती. आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर किती  मदत येते ? याकडं लक्ष वेधलं आहे. 

ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घालून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते.यंदा मोठ्या प्रमाणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उभी पिकं पाण्यात गेल्याने पिकांचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीत बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रचलीत दरापेक्षा जास्तीची मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यात सर्वाधिक मदत उस्मानाबाद तालुक्यास मिळाली आहे. बाधित क्षेत्राची संख्याही याच तालुक्यात सर्वाधिक आहे. यात सर्वात कमी मदत व बाधित क्षेत्र कमी लोहारा तालुक्यात आहे. शेतकऱ्यांना प्रती दोन हेक्टरसाठीच ही मदत असणार आहे. शासनाकडून मदत मिळाली असली तरी, पिक विमाही दिवाळीपूर्वी मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र शासनाने दरांची निकष लावलेले आहेत. त्यानुसार २१७ कोटी ५३ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र, राज्य शासनाने यात जास्तीची मदत देण्याचे जाहीर करून जास्तीची मदतही पोहोचवली आहे. त्यानुसार २३७ कोटी ६१ लाख रुपये जिल्ह्याला मिळाले आहेत. त्याचे वितरणही सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर काम करण्यात येत आहेत.
 

From around the web