निद्रिस्त आघाडी सरकारला जागं करण्यासाठी औसा ते तुळजापूर पदयात्रा

यात्रेचे उस्मानाबाद जिल्ह्यात आगमन , आ. राणा जगजितसिंह पाटील सहभागी 
 
s

तुळजापूर  - ओला दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे असंवेदनशील आघाडी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि निद्रिस्त आघाडी सरकारला खडबडून जागं करण्यासाठी औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली  शेतकऱ्यांसह औसा ते तुळजापूर पदयात्रा  सुरु करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबर रोजी औसा येथून सुरुवात झालेली ही यात्रा उद्या सोमवारी रोजी तुळजापूर येथे दाखल होणार आहे . 

आज सकाळी उस्मानाबाद  जिल्ह्यात या पदयात्रेचे आगमन होताच  तुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आमदार अभिमन्यु पवार व पदयात्रेतील सर्वांचे स्वागत केले ,तसेच  शेतकऱ्यांसह या पदयात्रेत सहभागी होऊन तुळजापूरच्या दिशेने प्रस्थान केले .

d

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यायला अद्याप मुख्यमंत्री मराठवाड्यात आले ना कृषिमंत्री आले . २-३ दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर होईल अशी आशा शेतकरी वर्गाला होती पण या सरकारने शेतकऱ्यांना तोकडी मदत जाहीर करून एकप्रकारे शेतकरी यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे दिसून येत आहे, अशी टीका यावेळी आमदार राणा पाटील यांनी केली.


 एप्रिल २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तुटपुंजी भरपाई सरकारने ६ ऑक्टोबर रोजी ६ महिने उशिरा जाहीर केली आहे, पण शेतकऱ्यांना मिळणार कधी असा सवालही राणा पाटील यांनी केला, सरकारचा मराठवाड्यातील उस्मानाबाद  जिल्हा व लातूर जिल्ह्याप्रती दुजाभाव इतका की त्यात त्यांना पाहिजे तितकी मदत फडणवीस सरकार यांचा कार्यकाळ वगळता आजतागायत कधीच भेटली नाही लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १ रुपयाची सुद्धा मदत देण्यात आलेली नाही. 

d

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याची संवेदनशीलता, मुजोर विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचे धैर्य आणि शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची सद्बुद्धी आघाडी सरकारला मिळावी असे साकडं आई तुळजाभवानी ला आम्ही घालणार असल्याचे यावेळी आमदार अभिमन्यु पवार व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

     लातूर जिल्ह्यातील ११ तारखेचे नियोजित १२७ शेतकऱ्यांचे ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन आणि ही पदयात्रा म्हणजे आघाडी सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा पोहचवण्याचा प्रयत्न होता, यानंतरही सरकार जागं झालं नाही तर संघर्ष तीव्र करनार असल्याचेही श्री पवार यांनी सांगितले .

From around the web