हरभरा आणि गहू पिकांच्या अभियानात 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारणार 

 
shetkri

उस्मानाबाद -  राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत (एन एम एटी) बियाणे व लागवड साहित्य उपअभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगाम 2021 - 22 मध्ये फार्म सेव्हड सिड वृध्दिगंत करून शेतकरी स्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने या उपअभियानांर्गत हरभरा आणि गहू या पिकांसाठी ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम कृषी विभाग  आणि महाबिज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे . 

जिल्ह्यास हरभरा पिकासाठी 4200 क्विा. आणि गहू पीकासाठी 620 क्वि(. चे लक्षांक प्राप्त आहे. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत प्रती शेतकरी 01 एकरच्या मर्यादेत लाभ मिळणार आहे , हरभरा पींकासाठी 10 वर्षाच्या आतील (जात- फुले विक्रम,राजविजय 202, AKG - 1109, फुले विक्रांत) बियाण्यासाठी  25 रुपये प्रती किलो अनुदान देय आहे आणि  10 वर्षावरील (जात - जॅकी - 9218, दिग्वीजय, विजय, विशाल, विराट) बियाण्यासाठी  12 रुपये  प्रती किलो अनुदान देय आहे. तसेच गहू पिकाठी 10 वर्षाच्या आतील (जात - फुले समाधान,NPAW - 1415) बिण्यासाठी  20 रुपये प्रती किलो अनुदान देय आहे आणि  10 वर्षावरील (जात - MACs - 6222, HI - 1544, GW - 496, लोकवन) बियाण्यासाठी  10 प्रती किलो अनुदान देय आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी नजिकच्या सामुहीक सेवा केंद्रे, ठिकाणी जाऊन किंवा ज्या शेतक-याकडे Android स्मार्ट मोबाईल आहे. अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन " Maha DBT Farmer" हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यावे. या सुविधा वापरकर्ता  आयडी आणि  आधार क्रमांक आधारीत असल्याने एकाच गावातुन स्मार्ट मोबाईल असणा-या शेतक-यांच्या मोबाईलवर सदर ॲप्लिाकेशन डाऊनलोड केल्यास अनेक शेतकरी अर्ज करू शकतील. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 आहे.

ग्रामबिजोत्पादन योजनेत जिल्ह्यातील उस्मानाबाद ग्रामीण, बेंबळी, तुळजापुर, सावरगाव,  कळंब, मोहा, उमरगा, मुरूम, परंडा, आसु, भुम, ईट, लोहारा, वाशी या महसुल मंडळाची निवड करण्यात आलेली असुन निवडण्यात आलेल्या महसुल मंडळातील गावातील शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयासी संपर्क साधावा. असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.              

From around the web