बियानासाठी चांगले सोयाबीन पुढील खरीप हंगामासाठी राखून ठेवण्याचे आवाहन

 
s

उस्मानाबाद - सद्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीस तयार झाले आहे. हे नवीन सोयाबीन विक्रीसाठी बाजारात येऊ लागले आहे. यंदा सोयाबीनला चांगला दर मिळेल, अशी शेतक-यांना आशा आहे. मात्र सोयाबीन दराबाबत शेतक-यांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता बाजाराचा संपूर्ण अभ्यास करुनच सोयाबीन विक्री करावे. तसेच विक्री करत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले चांगले सोयाबीन बियाणे पुढील वर्षीच्या पेरणीसाठी आवश्यक आहे. तेवढे राखून ठेवावे.                  

 घरच्या घरी बियाणे राखून ठेवताना  काय काळजी घ्यावी ,  याबाबत या पूर्वीही कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आलेली आहे. त्यानुसार बियाण्यासाठी राखून ठेवलेल्या प्लॉटमधील भेसळीची झाडे काढून टाकावीत ,  त्यामध्ये सर्वसाधारण  पीकापेक्षा कमी किंवा जास्त उंचीची, वेगळया वेगळया रंगाची फुले आणि शेंगा असलेली तसेच रोगट झाडे काढूण टाकविता .  साठवणुकीच्या काळात बुरशीची वाढ होणार नाही , याची काळजी घ्यावी. प्लॉटच्या चारही बाजूच्या शेतात त्याच वाणाचे सोयाबीन बियाणे असेल तर ठीक अन्यथा ज्या बाजूस त्या वाणाचे बियाणे नाही. त्या बाजूच्या बांधापासून तीन  मीटर आतपर्यंतची झाडे बियानासाठी  काढणीच्या वेळी घेऊ नयेत. कापणी नंतर किंवा काढणी नंतर पावासात भिजलेले सोयाबीन बियाण्यांसाठी राखून ठेवू नये. 

कापणीनंतर सोयाबीनच्या शेंगावर बुरशी येईल, अशा पध्दतीने साठवणूक करु नये. सर्वसाधारणपणे मळणी करताना मळणी यंत्राची गती ही 700 ते 750 RPM असते, बियाण्यांसाठी राखून ठेवलेल्या पिकाची मळणी करत असताना मळणी यंत्राची गती 300 ते 350 RPM ठेवावी. जेणेकरुन बियाण्यांची आदळ आपट कमी प्रमाणात होईल. साठवणूक करण्यापूर्वी बियाण्यातील आर्द्रता 9-12 टक्के राहील. याची काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना बॅग कोंदट जागेत न ठेवता हवेशीर जागेत करावी जेणेकरुन बुरशीची वाढ होणार नाही. एकावर एक जास्तीत जास्त तीन  बॅग साठवून ठेवण्यात याव्यात किंवा बॅग भिंतीला लागून उभी ठेवण्यात यावी. पोत्यांची थप्पी जमिनीपासून 10 ते 15 से.मी. उंचीवर लाकडी फळयांवर लावावी. या बाबींची काळजी घेतल्यास आपल्याला मिळणारे बियाणे दर्जेदार असेल याद वाद नाही.

      अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.               

From around the web