सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार ?

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा सवाल 
 
z

उस्मानाबाद -  धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालूक्यातील सर्व महसुल मंडळांमध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सततच पाउस, शंखी गोगलगाय, येलो मोझॅक व खोडमाशी मुळे शेतकऱ्यांचे मुख्य पिक असलेल्या सोयाबीन पीकाचे मोठ्य प्रमाणात नुकसान झाले आहे.

                शेतकऱ्यांनी वेळेत शेतीच्या मशागतीची कामे करुन खत-बियाणांची खरेदी करुन खरीप हंगामाची पेरणी पुर्ण केली परंतु खरीप हंगामाच्या सुरुवातीस सततच्या पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीन या पिकांवर मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगाय, बोंडअळी, येलो मोझॅक आणि सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिके हे पिवळे पडून विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवून सर्व पिके शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. त्यानंतर उर्वरित सोयाबीन पिकास खोडमाशी व चक्री भुंगा या किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये मर होत असून उर्वरित सोयाबीन पिक हे शेतकऱ्यांच्या हातातून केवळ नैसर्गिक आपत्ती व सततच्या पावसामुळे गेले आहे, याचे देखील पंचनामे करावे,   अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. 

                धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक महसुल मंडळात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आपण पाहणी केली. या दौऱ्यासाठी तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी यांच्यासही तालूका कृषी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या पाहणी दौऱ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान असल्याचे सांगितले. पाहणी दौऱ्या दरम्यान सोयाबीनचे पिक हे हिरवे दिसत असले तरी प्रत्यक्षात खोडमाशी व चक्री भुंगा या किडींच्या प्रादुर्भावामुळे सदर पिकास कोणत्याही प्रकारची फळधारणा नसल्याचे आढळुन आले सदर पिक हे चक्री भुंगा व खोडमाशी या किडींचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकाच्या झाडाच्या खोडामधून झाला आहे. 

वरकरणी सोयाबीन पिक हे हिरवेगार दिसत असले तरी फळधारणा नसल्यामुळे व किडींच्या प्रादुर्भावामुळे हजारो हेक्टरमधील सोयाबीन पिक हे संपुर्णत: वाया गेले त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे शुन्य आहे. अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित महसुल मंडळामध्ये तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालूका व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये अशी परिस्थीती असून येत्या काही दिवसांमध्ये चक्री भुंगा व खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास बाधीत क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत सततचा पाऊस, शंखी गोगलगाय आणि येलो मोझॅक ने बाधीत असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेस अनुसरून  शेतकऱ्यांचे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून वंचीत राहीलेले क्षेत्र खालील तक्त्यात आहे.

अ.क्र.

 

शेतकरी

बाधीत क्षेत्र (हेक्टर)

अपेक्षीत मदत (कोटी)

१.

उस्मानाबाद जिल्हा

१४७९५३

११३७४१

१५४.७९

२.

तालुका निलंगा, जि.लातूर

८०४५०

५३०९७

३६.१०

३.

तालुका औसा, जि.लातूर

८५८३२

५३३०२.०७

३६.२४

४.

तालुका बार्शी, जि.सोलापूर

७०२२०

४७९६४

७७.५५

एकुण

३८४४५५

२६८१०४

३०४.६८


                या नमुद तालुक्यातील महसूल मंडळांसाठी मदत जाहीर करण्यासंदर्भात अपेक्षित रक्कम ३०४.६८ कोटी इतकी असून त्याप्रमाणे मदत मिळणेकरिता  खासदारओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री.एकनाथ शिंदे  आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल  सत्तार  यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

From around the web