आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास विविध ग्रामपंचायती, सोसायटी व संघटनांचा पाठिंबा

 
as

उस्मानाबाद - सन २०२० चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा, या व अन्य  मागण्यासाठी शिवसेना आमदार कैलास पाटील हे गेल्या तीन दिवसापासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून, या उपोषणास जिल्हातील विविध ग्रामपंचायती, सोसायटी व संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. 


सोमवार दि. 24 ऑक्टोंबर 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्या पुर्ण व्हाव्यात याकरीता आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांचे उपोषण चालू असून  ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार आ. कैलास पाटील केला आहे. 

            या उपोषणास विविध स्तरावरुन उपोषणास पाठिंबा मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील एकुण 105 ग्रामपंचायतींनी उपोषणास पाठिंबा दिला असून अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती, ऑल इंडिया पँथर सेना ग्रामीण, सिवील राईट्स संघटना धाराशिव, लहुजी शक्ती सेना, राघुचीवाडी, स्वराज इंडीया महाराष्ट्र, रा.स.प. जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेना महासंघ, टायगर सोशल ग्रुप, धाराशिव, भवानी ग्रुप, धाराशिव, जय जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, वाखरवाडी, भारतीय मराठा महासंघ, किसान शेती साधन पुरवठा सहकारी संस्था, धाराशिव शहर काँग्रेस समिती, संभाजी ब्रिगेड, धाराशिव, बळीराजा शेतकरी स्वायत्त बचत गट, मंगरुळ, भिम आण्णा सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना, मोहोळ जि. सोलापूर, गोंधळी समाज सेवा संघ, 9 सोसायटी तसेच आम आदमी पार्टी, धाराशिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सांस्कृतिक विभाग), धाराशिव व काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

यामध्ये हजारो शिवसैनिक, शेतकरी दररोज येवून भेटून जात आहेत. त्यामुळे सरकारने व जिल्हा प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेवून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची भरपाई तात्काळ जमा करावी, असे आवाहनकरण्यात आले आहे.

From around the web