३.८२ लाख हेक्टर क्षेत्राला अनुदान, उर्वरित नुकसानीचे पंचनामे सुरूच … 

खरीप २०२२ नुकसानी पोटी विक्रमी रु ४९४.०९ कोटी पेक्षा जास्त अनुदान मिळणार
 
s

 -   आ. राणाजगजितसिंह पाटील

 

उस्मानाबाद  - खरीप २०२२ मध्ये पिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानी पोटी १.८० लाख हेक्टर बाधित क्षेत्रावरील २२३६९२ शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे रू. २४५.५३ कोटी अनुदान वितरित करण्यात आले असून अधिकच्या १. ८२  लाख हेक्टर बाधित क्षेत्रा पोटी रू. २४८.५६ कोटीची २४८८०१ शेतकऱ्यांची यादी मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आली आहे. सदरील शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावात उपलब्ध ठेवण्याच्या सूचना महसुल यंत्रनेला देण्यात आल्या आहेत. या मंजूरी नंतर जिल्ह्याला आजवरच्या इतिहासातील विक्रमी रू. ४९४.०९ कोटी अनुदान प्राप्त होणार आहे, जे आजवर दिल्या गेलेल्या अनुदानात सर्वाधिक आहे, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

सर्वसामान्यांचे शिंदे - फडणवीस सरकार शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून काम करत असून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत करत आहे. याउपर देखील उर्वरित बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरूच आहेत, नुकसान झालेल्या उर्वरीत शेतकऱ्यांचे पंचनामे करून घेण्याची जबाबदारी व यामध्ये कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता गावातील प्रमुख नेत्यांनी पार पाडणे अपेक्षित आहे. भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांना या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत.

x

आज धाराशिव तालुक्यातील तावरजखेडा, जागजी, आरणी, पाटोदा व करजखेडा या गावातील बाधित क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली, व शासनाकडून केल्या जात असलेल्या मदतीची माहिती दिली. अनुदानाची यादी प्रत्येक गावात उपलब्ध करण्याच्या सूचना यापूर्वीच महसूल विभागाला देण्यात आल्या होत्या. तलाठ्यांशी संपर्क साधून यादीत नाव नसल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लेखी तक्रार देऊन पोच घ्यावी व पंचनामे करून घ्यावेत अशा सूचना देण्यात आल्या असून कुठलीही अडचण असल्यास व्यक्तिश: संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.  

From around the web