पीकविम्यासाठी ऑनलाईन तक्रारीची अट रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे निवेदन

 
s

उस्मानाबाद - पीकविमा कंपनी व कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी ऑनलाइन तक्रारी करण्याचे सांगण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रिया जमत नसल्यामुळे ते पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे ऑनलाईन तक्रारीची जाचक अट रद्द करण्याची मागणी वाशी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

याबाबत शुक्रवारी (दि.२३) जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले आह.े. यात म्हटले की, वाशी तालुक्यात सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानासोबतच गोगलगाय, यलो मोझॅक, तांबेरा या रोगांमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे लोहारा, उमरगा व तुळजापूर या तीन तालुक्यांच्या धर्तीवर वाशी तालुक्याला २५ टक्के अग्रीम विमा तात्काळ मंजूर करावा, वाशी तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ८० हजाराची मदत द्यावी, सन २०२० च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सोयाबीन पिकाचा विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावा, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या आदेशाप्रमाणे ५० हजारापर्यंत कसलीही पळवाट न काढता शेतकऱ्यांना दसरा व दिवाळीच्या सणापूर्वी तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेदनावर शेतकरी संघटनेचे वाशी तालुकाध्यक्ष दादासाहेब चेडे, तालुका उपाध्यक्ष विलासराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष वसंतराव कवडे, तालुका संघटक भारत मोळवणे, वसंतराव कवडे, शिवाजीराव उंद्रे, जगन्नाथ घुले आदींची स्वाक्षरी आहे.
 

From around the web