डीसीसी बँकेला राज्य सरकराने ७५ कोटी पाठवले , पण बँकेने शेतकऱ्यांना वाटप केले नाही... 

 अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना तातडीन वितरीत करा – नितीन काळे
 
s

उस्मानाबाद - महाविकास आघाडी सरकारने सत्त्तेत आल्यानंतर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली. परंतु दोन वर्षानंतर देखील प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा विषय प्राधान्याने  घेत बँकाकडे पैसे वर्ग केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आधार प्रमाणीकरण झालेल्या २३३९३ शेतकऱ्यांचे रू.७५.६१ कोटी राज्य सरकारने वर्ग केले आहे. परंतु जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाही. अशा असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग केलेले रु.७५.६१ कोटी प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात यावे या करिता जिल्हा मध्यवर्ती बँकेला ‍निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी सुनील काकडे, सतीष दंडनाईक, प्रदिप शिंदे, राजसिंह राजेनिंबाळकर, नाना कदम, अभय इंगळे, देवा नायकल, गणेश मोरे, शेषेराव उंबरे, अमोल निडवदे, प्रविण सिरसाठे, सुजित साळुंके, सचिन लोंढे, जगदिश जोशी, प्रविण घुले, सागर दंडनाईक, शेतकरी बांधव व इतर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

From around the web