शिवसेना आ. कैलास पाटील यांचे सोमवारपासून आमरण उपोषण 

 
dada1
 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2020 च्या पीक विम्याची 531 कोटी रुपये रक्कम . जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करण्याची मागणी 

उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2020 च्या पीक विम्याची 531 कोटी रु. जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी., या व अन्य मागण्यासाठी शिवसेना आमदार  कैलास पाटील हे सोमवार दि. 24 ऑक्टोंबर 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. 

या आमरण उपोषणाच्या  अनुषंगाने जिल्हाभरातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत  पवनराजे कॉम्प्लेक्स येथील संपर्क कार्यालयात पार पडली . 

ग्राम स्तरावर शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख शहर प्रमुख, व जिल्ह्यातील आजीमाजी लोकप्रतिनिधी आपापल्या परीने शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी उपोषणे करावीत व शासन दरबारी आवाज उठवावा जेणेकरुन खालील मागण्या मंजूर होण्यास मदत होईल अशा सुचना खासदार ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

s

उपोषणातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे

1.      सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2020 च्या पीक विम्याची 531 कोटी रु. जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी.

2.     531 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईच्या विमा रक्कमेत कोणतीही छुपी कपात करु नये.

3.     सन 2021 च्या पीकविम्याची उर्वरित 50 टक्के म्हणजेच 388 कोटी  रुपयांची रक्कम ही विमा पात्र 6 लाख 67 हजार 287 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे.

4.     सप्टेंबर 2022 मधील सततचा पाऊस व अतिवृष्टी, ढगफुटी, रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 248 कोटी रुपये 2 लाख 48 हजार 801 शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत.

 5.     धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आज पर्यंतचे विमा व अतिवृष्टीचे 1200 कोटी रु. तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत.

6.     ओला दुष्काळ जाहीर करावा.

s

      याप्रसंगी जिल्हाप्रमुख गौतम लटके सर, कळंब तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे, धाराशिव तालुका प्रमुख सतिशकुमार सोमाणी, तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ दाजी गवळी, भूम तालूका प्रमुख श्रीनिवास जाधव, वाशी तालुका प्रमुख विकास मोळवणे, परांडा तालुका प्रमुख मेघराज पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख तथा राज्य विस्तारक अक्षय ढोबळे, युवासेना जिल्हा प्रुख डॉ. चेतन बोराडे, युवासेना युवती राज्य विस्तारक मनिषा वाघमारे, ॲड. भाग्यश्री रणखांब, शहरप्रमुख पप्पु मुंढे, कळंब शहरप्रमुख प्रदिप मेटे, लोहारा शहर प्रमुख सलीम शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आमीर शेख, डीसीसी बँकेचे संचालक संजय देसाई, धाराशिव युवासेनेचे तालुकाप्रमुख वैभव वीर, आय.टी सेल जिल्हाप्रमुख रणजित महाडिक, तुळजापूर उपतालुकाप्रमख रोहित चव्हाण, नामदेव लोभे, विष्णु ढोणे, युवासेना तालुकाप्रमुख लोहारा अमोल बिराजदार, युवासेना शहरप्रमुख गोविंद चौधरी, माजी पंचायत उपसभापती शामभैय्या जाधव, माजी पंचायत समिती सदस्य संग्रामभैय्या देशमुख, गजेंद्र जाधव, नगरसेवक गणेश खोचरे, नगरसेवक सोमनाथ अप्पा गुरव, नगरसेवक बाळासाहेब काकडे, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, भिमाआण्णा जाधव, वाशी शहरप्रमुख लाईकभाई तांबोळी, युवासेना शहरप्रमुख अनिल दाणे, राजाभाऊ गावडे, राजाभाऊ नळेगावकर, अतिक सय्यद, बळीराम कांबळे, सत्यजित पडवळ, राकेश सुर्यवंशी, सचिन काळे, आश्रुबा बिक्कड, दिलीप बापू पाटील, कलीम कुरेशी, गफुर शेख, अर्जुन आप्पा साळुंखे, बापू साळुंखे तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

From around the web